नवी दिल्ली: गेल्या काही दिवसांपासून टूलकिटचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, यावरून आता राजकारण तापण्याची चिन्हे आहेत. सोमवारी रात्री दिल्लीपोलिसांचे विशेष कक्षाचे पथक ट्विटरच्या कार्यालयात दाखल झाले होते. त्यानंतर आता दिल्ली पोलिसांनी टूलकिटप्रकरणी काँग्रेसच्या दोन नेत्यांना नोटीस बजावल्याची माहिती मिळत आहे. भाजप प्रवक्ते संबित पात्रा यांनी पत्रकार परिषद घेऊन काँग्रेस टूलकिटच्या माध्यमातून पंतप्रधान मोदी आणि केंद्र सरकारची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा दावा केला होता. (delhi police issues notice to two congress leaders in toolkit case)
दिल्ली पोलिसांच्या विशेष तपास कक्षाने काँग्रेस नेते राजीव गौडा आणि रोहन गुप्ता यांना नोटीस बजावली असून, टूलकिट प्रकरणी या दोघांचा जबाब नोंदवण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे. काँग्रेसच्या या दोन्ही नेत्यांनी संबित पात्रा यांच्या ट्विटविरोधात तक्रार दिली होती. आमच्या तक्रारीवरून छत्तीसगडमध्येही खटला दाखल करण्यात आला आहे. आम्ही दिल्ली पोलिसांच्या नोटिसीला उत्तर दिले. आम्ही तिथे या प्रकरणाचा पाठपुरावा करू, असे राजीव गौडा यांनी म्हटले आहे.
मेहुल चोक्सी अँटिग्वामधून बेपत्ता; क्युबामध्ये पळाल्याचा अंदाज
मॅनिपुलेटेड टॅग देणार्याचा शोध
दिल्ली पोलीस संबित पात्रा यांच्या ट्विटवर सेल ट्विटर मॅनिपुलेटेड टॅग देणार्याचा शोध घेत आहेत. सेल-अधिकारीही सोमवारी दिल्ली-एनसीआरमध्ये असलेल्या ट्विटर ऑफिसमध्ये पोहोचले होते. काँग्रेसच्या कथित ‘टूलकिट’बाबत भाजपचे प्रवक्ते संबित पात्रा यांनी ट्विटला ट्विटरने ‘फेरफार’ प्रकारात वर्गीकृत केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी ट्विटरला रविवारी पत्र पाठवले होते.
आता जिल्हा बॅंकांच्या विलीनीकरणासाठी RBI ची परवानगी अनिवार्य; गाइडलाइन्स जारी
माजी मुख्यमंत्र्यांचा जबाब नोंदवणार!
रायपूर पोलिसांनी टूलकिटप्रकरणी छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि भाजप नेते रमण सिंह यांना जबाब नोंदवण्यासाठी २४ मे रोजी हजर राहण्याचे निर्देश दिले आहेत. भाजपकडून करण्यात आलेले आरोप काँग्रेसने फेटाळून लावले असून, संबित पात्रा आणि माजी मुख्यमंत्री रमण सिंग यांच्याविरोधात पोलिसांत एफआयआर नोंदवण्यात आला आहे.