कुस्ती महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात महिला कुस्तीपटूंनी गेल्या काही दिवसापासून दिल्लीत आंदोलन सुरू केलं आहे. दिल्ली पोलिसांनी या संदर्भात आता तपास सुरू केला आहे. दिल्ली पोलिसांनी या संदर्भातील तपासासाठी ३ देशांकडे मदत मागितली आहे. कजाकिस्तान, मंगोलिया, इंडोनेशिया या देशांकडून मदत मागितली आहे. सिंह यांच्यावर अनेक कुस्तीपटूंनी लैंगिक छळाचे आरोप केले आहेत.
दिल्ली पोलिसांनी तिन्ही देशांतील कुस्ती महासंघांना नोटीस पाठवली आहे. येथील सीसीटीव्ही फुटेज आणि फोटो देण्यास सांगितले आहे. महिला कुस्तीपटूंनी २०१६, २०१८ आणि २०२२ मध्ये येथे लैंगिक छळाचे आरोप केले आहेत. कुस्तीपटूंनी नुकतेच जंतरमंतरवर सुरू असलेले त्यांचे धरणे आंदोलन मागे घेतले आहे.
WFI मध्ये निवडणूक येथे कुस्ती महासंघात निवडणुकीची तयारी सुरू आहे. ४ जुलै रोजी निवडणूक होणार असल्याची माहिती फेडरेशनने सोमवारी दिली. यासाठी उच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश महेश मित्तल यांना निवडणूक निर्णय अधिकारी करण्यात आले आहे. विशेष म्हणजे सिंह यांना ही निवडणूक लढवता येणार नाही. त्याचे कारण म्हणजे त्यांचा तीन वेळा अध्यक्षपदाचा कार्यकाळ. नियमानुसार ते कोणत्याही पदासाठी निवडणूक लढवू शकत नाही.
काही कुस्तीपटूंनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली होती. त्यानंतर काही पैलवान विरोध मागे घेतला. आता १५ जूनपर्यंत आरोपपत्र दाखल होण्याची प्रतीक्षा पैलवानांना असल्याचे बोलले जात आहे. यानंतर आंदोलनाबाबत मोठी घोषणा होऊ शकते. कुस्तीपटू विनेश फोगटने पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते क्रीडामंत्री अनुराग ठाकूर यांच्यापर्यंत प्रश्न उपस्थित केले आहेत.
शेतकरी आंदोलनादरम्यान अकाऊंट ब्लॉक करण्यासाठी दबाव; ट्विटरचे जॅक डोर्सी यांचा दावा
यापूर्वीही सरकारने चौकशीसाठी समिती स्थापन केली होती. सुरुवातीला पैलवान सिंह यांच्यावर गुन्हा दाखल करण्याची मागणी करत होते. सध्या दिल्ली पोलिसांनी त्यांच्याविरुद्ध दोन एफआयआर नोंदवले आहेत.