राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची 'गुगली'; नोटीस पाठवून त्यांच्याकडूनच मागितली पीडित महिलांची यादी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 16, 2023 09:20 PM2023-03-16T21:20:09+5:302023-03-16T21:22:25+5:30

Rahul Gandhi, Delhi Police: राहुल गांधींनी केलेल्या भाषणानंतर दिल्ली पोलीसांची कारवाई

Delhi police sent notice to rahul gandhi seeking details of physically abused women that he referred on his speech | राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची 'गुगली'; नोटीस पाठवून त्यांच्याकडूनच मागितली पीडित महिलांची यादी

राहुल गांधींना दिल्ली पोलिसांची 'गुगली'; नोटीस पाठवून त्यांच्याकडूनच मागितली पीडित महिलांची यादी

googlenewsNext

Rahul Gandhi, Delhi Police: काँग्रेस खासदार राहुल गांधी गेल्या काही दिवसांपासून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सरकारच्या नेतृत्वाखाली सरकारवर जोरदार टीका करताना दिसत आहेत. नुकतीच त्यांनी देशातील महिलांच्या सुरक्षेबद्दल काही विधाने केली होती. त्यावरून दिल्लीपोलिसांनीराहुल गांधींनाच गुगली टाकली आहे. दिल्लीपोलिसांनी राहुल गांधींना नोटीस पाठवली आहे. त्यात लिहिण्यात आले आहे की, ज्या पिडीत महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाची किंवा शारीरिक अत्याचाराची व्यथा राहुल गांधी यांच्याकडे मांडली आहे, त्या महिलांची यादी राहुल यांनी पोलिसांना द्यावीत.

राहुल गांधींनी श्रीनगरमध्ये वक्तव्य केले होते की, देशातील काही भागात महिलांचा लैंगिक छळ आणि शारीरिक शोषण होत असल्याचे मी  भारत जोडो यात्रेदरम्यान ऐकले आहे. अशा परिस्थितीत दिल्ली पोलिसांनी आता राहुल गांधींना त्या पीडितांची माहिती देण्यास सांगितले आहे, जेणेकरून त्यांना संरक्षण देता येईल. याबाबत माहिती देताना दिल्ली पोलिसांनी म्हटले आहे की, दिल्ली पोलिसांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना, लैंगिक छळाच्या संदर्भातील वक्तव्याबाबत संपर्क साधलेल्या पीडितांची माहिती देण्यासाठी नोटीस बजावली आहे. पोलिसांनी सोशल मीडिया पोस्टची दखल घेत प्रश्नांची यादी पाठवली आहे.

काय होते राहुल गांधींचे वक्तव्य?

त्यांनी श्रीनगरमध्ये निवेदन दिले की, एका प्रकरणात मी एका मुलीला विचारले, तिच्यावर बलात्कार झाला, मी तिला विचारले की आपण पोलिसांना बोलावू का, ती म्हणाली पोलिसांना बोलवू नका, माझी बदनामी होईल. मिळालेल्या माहितीनुसार, राहुल गांधी यांच्या घरी दिल्ली पोलिसांनी ही नोटीस दिली आहे. खुद्द राहुल गांधी यांनी ती नोटीसही स्वीकारली आहे.

लंडनच्या वक्तव्यावर राहुल गांधी काय म्हणाले?

याआधी राहुल गांधी यांनी लंडनमध्ये केलेल्या विधानाबाबत संसदेत झालेल्या गोंधळावर गुरुवारी म्हणाले की, देशात लोकशाही अबाधित असेल, तर त्यांना संसदेत बोलण्याची संधी मिळाली पाहिजे कारण सरकारचे चार मंत्री आहेत. त्यांंना विरोध केला आहे की आरोप-प्रत्यारोप केले जातात. विरोधकांनाही इतर मंत्र्यांप्रमाणे सभागृहात बोलण्याची पूर्ण संधी मिळाली पाहिजे. भारतीय लोकशाही टिकवणे गरजेचे आहे, असेही ते म्हणाले होते.

Web Title: Delhi police sent notice to rahul gandhi seeking details of physically abused women that he referred on his speech

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.