शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
3
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
4
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
5
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
6
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
7
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
8
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
9
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
10
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
11
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
12
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
13
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
14
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
15
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
16
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
17
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या
18
शरद पवार, काँग्रेसने उद्धव ठाकरेंना फसवले; बावनकुळेंनी करून दिली युतीच्या जागावाटपाची आठवण
19
समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, कार समोरील वाहनाला धडकली; तीन जण जागीच ठार, तीन जखमी
20
IPL Retention List : अखेर घोषणा झाली! अनेकजण लिलावात; कोणी कोणाला केलं रिटेन? वाचा यादी, विराट मालामाल

खलिस्तानी गुरपतवंत सिंग पन्नूच्या एका गुंडाला अटक, दिल्ली पोलिसांची मोठी कारवाई

By ऑनलाइन लोकमत | Published: November 21, 2023 10:46 AM

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शीख फॉर जस्टिस आणि भारतविरोधी कारवाया करणार्‍या संस्थेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या सूचनेनुसार, काम करणाऱ्या एका गुंडाला अटक केली आहे. 

नवी दिल्ली : खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी कारवाया करणाऱ्या शीख फॉर जस्टिसचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू याच्यावर दिल्लीपोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने शीख फॉर जस्टिस आणि भारतविरोधी कारवाया करणार्‍या संस्थेचे प्रमुख गुरपतवंत सिंग पन्नू यांच्या सूचनेनुसार, काम करणाऱ्या एका गुंडाला अटक केली आहे. 

अटक करण्यात आलेल्या आरोपीने उत्तर दिल्लीतील काश्मिरी गेट परिसरात दोन महिन्यांपूर्वी वादग्रस्त घोषणा लिहिल्याचं सांगण्यात येत आहे. याप्रकरणी पोलिसांनी तपासादरम्यान या आरोपीला अटक केली आहे. दरम्यान, दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने दोन महिन्यांपूर्वी दिल्लीतील काश्मिरी गेट फ्लायओव्हरवर खलिस्तान समर्थक भित्तिचित्रे सापडल्याप्रकरणी हरयाणातील एका तरुणाला ताब्यात घेतले आहे. 

गुरपतवंत सिंग पन्नू याच्या सांगण्यावरून त्याने दिल्ली आणि देशाच्या इतर भागात अशी चित्रे काढल्याचा संशय आहे, अशी माहिती पोलीस सूत्रांनी मंगळवारी दिली. तसेच, काश्मिरी गेट फ्लायओव्हरवर खलिस्तान समर्थक आणि भारतविरोधी घोषणा लिहिण्यात आल्याने पोलिसांनी २७ सप्टेंबर रोजी एफआयआर नोंदवला होता. गुरपतवंत सिंग पन्नू हा भारतात बंदी घातलेल्या शीख फॉर जस्टिस या संघटनेचा प्रमुख आहे.

पन्नूविरोधात देशद्रोहाचे गुन्हेदहशतवादी पन्नू वेळोवेळी भारतविरोधी वक्तव्ये देत असतो आणि व्हिडिओंच्या माध्यमातून भारतीय शीखांना चिथावणी देण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या आणि त्याच्या संघटनेच्याविरुद्ध भारतात अनेक गुन्हे दाखल आहेत. पंजाबमधील शीख तरुणांना शस्त्रे उचलण्यास आणि फुटीरतावादासाठी प्रोत्साहित केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. पंजाबमध्ये पन्नूवर देशद्रोहाचे तीन गुन्हे दाखल आहेत. पन्नूला गृह मंत्रालयाने दहशतवादी घोषित केले होते. 

पन्नूची भारतातील मालमत्ता जप्तएनआयएने अमृतसरच्या खानकोट गावात गुरुपतवंत सिंग पन्नू याची जमीन ताब्यात घेतली आहे. ही शेतजमीन आहे. खानकोट हे पन्नूचे वडिलोपार्जित गाव आहे. त्याचे चंदीगडमधील सेक्टर १५ सी येथील घरही एनआयएने जप्त केले आहे. यापूर्वी २०२० मध्ये त्याची मालमत्ता जप्त करण्यात आली होती. कायदेशीररित्या, पन्नू आता या मालमत्तांचे मालक नाही. या मालमत्ता आता सरकारच्या मालकीच्या आहेत.  

टॅग्स :delhiदिल्लीPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी