नवी दिल्ली - मंगळवारी दिल्लीत प्रजासत्ताक दिनी आयोजित करण्यात आलेल्या ट्रॅक्टर रॅलीमध्ये मोठ्या प्रमाणात हिंसाचार झाला होता. आता या हिंसाचार प्रकरणी आता कायदेशीर कारवाईस सुरुवात झाली आहे. दरम्यान, आज दिल्लीच्या पोलीस आयुक्तांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना काही शेतकरी नेत्यांवर गंभीर आरोप केला आहे.दिल्लीचे पोलीस आयुक्त एसएन श्रीवास्तव यांनी काही व्हिडीओ शेअर करत शेतकरी नेत्यांनी प्रक्षोभक विधाने केल्यामुळे आंदोलक भडकले. सतनाम पन्नू यांनी केलेल्या प्रक्षोभक भाषणांमुळे शेतकरी भडकले. असे सांगत श्रीवास्तव यांनी शेतकरी नेत्यांनी केलेल्या काही प्रक्षोभक व्हिडीओ शेअर केले. राकेश टिकेत यांच्यासोबत असलेल्या शेतकऱ्यांनीही हिंसाचार केल्याची माहितीही त्यांनी दिली.
दिल्ली पोलिसांचा ‘लाव रे तो व्हिडीओ’, प्रसारमाध्यमांसमोर दाखवले शेतकरी नेत्याचे प्रक्षोभक भाषण
By ऑनलाइन लोकमत | Published: January 27, 2021 8:45 PM