शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

Delhi Pollution : दिल्लीत आजही प्रदूषणाने केला कहर, एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार

By ऑनलाइन लोकमत | Published: November 22, 2019 8:35 AM

दिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे.

ठळक मुद्देदिल्लीतील प्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे.

नवी दिल्ली - दिल्लीतीलप्रदूषणात वाढ होत असून हवेची गुणवत्ता ही आणखी खालावली आहे. दिल्लीत आजही प्रदूषणाने कहर केला असून एअर क्वालिटी इंडेक्स 350च्या पार आहे. प्रदूषणात वाढ झाल्याने श्वास घेणं ही लोकांसाठी कठीण झालं आहे. वायू गुणवत्ता खराब श्रेणींमध्ये आली असून येत्या काही दिवसांत ती आणखी खालावण्याची देखील शक्यता वर्तवण्यात येत आहे. दिल्लीतील प्रदूषणाच्या समस्येवर लोकसभेत चर्चा झाली. यामध्ये पूर्वी दिल्लीचे मुख्यमंत्री खोकत होते, आता दिल्लीतील सर्व लोकं खोकत असल्याचे सांगत भाजपाचे खासदार प्रवेश साहिब सिंह यांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली आहे.

दिल्लीच्या वातावरणात  शेजारच्या राज्यांमध्ये पेंड्या जाळल्यामुळे प्रदूषणात 10 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून येत आहे. दिल्ली व एनसीआर परिसरातील वातावरणात धुक्यासारखा प्रदूषित हवेचा पट्टा निर्माण झाला आहे. तीन महिन्यांनंतर दिल्लीतील हवेच्या प्रदूषणात आणखी वाढ झाली आहे. दिल्लीजवळील राज्यांमध्ये शेतकऱ्यांकडून पराली जाळली जात असल्याने दिल्लीतील हवेची गुणवत्ता बिघडली असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले होते. पंजाब, हरयाणातील पराली जाळली जात असल्यामुळे दिल्ली-एनसीआरमधील हवेच्या गुणवत्तेवर होणाऱ्या परिणामांबाबत चर्चा करण्यासाठी 10 सदस्यीय समितीने कृती आराखडा तयार केला आहे. राजधानीतील हवा काही प्रदूषित झाली आहे. प्रदूषित हवेच्या त्रास नागरिकांना बसू नये यासाठी दिल्लीकरांना मास्क वाटण्यात आले आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. 

दिल्लीमध्ये सोमवारपासून (4 नोव्हेंबर) दुचाकी वगळता सर्व वाहनांसाठी सम-विषम नियम लागू झाला आहे. दिल्ली सरकारने 4 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत हा वाहतूक नियम लागू केला आहे. या नियमाच्या कालावधीत वाढ करण्यात येणार असल्याचे संकेत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिले होते. तसेच गरज भासल्यास आणखी काही दिवस सम-विषम नियम लागू करण्यात येणार असल्याची माहिती केजरीवाल यांनी दिली होती. मात्र आता प्रदूषण कमी झाल्याने याची गरज नसल्याचं अरविंद केजरीवाल यांनी म्हटलं आहे. 

दिल्लीत हवाच नव्हे, पिण्याचे पाणीही अशुद्ध

दिल्लीची हवाच नव्हे, तर पाणीही अशुद्ध असल्याची माहिती दावा केंद्रीय ग्राहक, अन्न व सार्वजनिक वितरणमंत्री रामविलास पासवान यांनी शनिवारी दिली. भारतीय मानक ब्युरोने (बीआयएस) 20 राज्यांच्या राजधान्यांच्या केलेल्या सर्वेक्षणाच्या आधारे त्यांनी हे सांगितले.इतर शहरांच्या तुलनेत दिल्लीतील पाणी खराब असल्याचे दिसून आले. यावेळी रामविलास पासवान म्हणाले,"आम्ही कोणत्याही सरकारला दोष  देत नाही. या विषयावरून आम्ही राजकारण करत नाही. तर आमचे उद्दिष्ट लोकांपर्यंत स्वच्छ पाणी पोहोचले पाहिजे. त्यामुळे दिल्ली सरकारने समजून घेतले पाहिजे." देशातील शहरांमध्ये पाणी गुणवत्ता चाचणी यापुढे सुद्धा केली जाणार आहे. पिण्याच्या पाण्याची तीन टप्प्यांत चाचणी करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात सर्व राजधानींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. दुसऱ्या टप्प्यात स्मार्ट सिटींमधील पाण्याची चाचणी करण्यात येईल. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यात सर्व जिल्ह्यांतील पाण्याची चाचणी करण्यात येणार असल्याचे रामविलास पासवान यांनी सांगितले.  

टॅग्स :delhi pollutionदिल्ली प्रदूषणair pollutionवायू प्रदूषणArvind Kejriwalअरविंद केजरीवालpollutionप्रदूषणdelhiदिल्लीWaterपाणी