नवी दिल्ली - दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय एअरपोर्टवर (Delhi IGI Airport) विमानात बॉम्ब असल्याची सूचना आल्याने गोंधळ उडाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीहून पुण्याला रवाणा होणाऱ्या विमानात बॉम्ब असल्याची सूचना आहे. यासंदर्भात माहिती मिळताच सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या असून त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले आहे. गुरुवारी सायंकाळी जवळपास 07:07 वाजता एओसीसी (AOCC) ने (SOCC) ला दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइट SG 8938 मध्ये बॉम्ब आढळल्याची सूचना दिली होती.
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एक फोन कॉल आला होता. त्यावरून दिल्लीहून पुण्याला जाणाऱ्या फ्लाइटमध्ये बॉम्ब असल्याची माहिती देण्यात आली. महत्वाचे म्हणजे, हे विमान दिल्ली एअरपोर्टवरून पुण्याच्या दिशेने झेपावणारच होते, तेवढ्या ही सूचना मिळाली. यानंतर, सुरक्षा यंत्रणा तत्काळ सतर्क झाल्या आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केले.