नवी दिल्ली : गेल्या आठवड्यात वायव्य दिल्लीत एका चार वर्षीय चिमुकलीवरील बलात्काराच्या घटनेचा रोष कायम असतानाच राजधानीत आणखी दोन अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्काराच्या घटना उघडकीस आल्याने दिल्ली हादरली आहे.मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शहरात बलात्काराच्या वाढत्या घटनांवर चिंता जाहीर करून पंतप्रधान आणि नायब राज्यपाल काय करीत आहेत, असा संतप्त सवाल उपस्थित केला आहे. केंद्रीय गृहखात्याचे हे अपयश आहे. या घटनांसाठी दिल्ली सरकारला दोषी धरता येणार नाही, हा मुद्दाही केजरीवालांनी अधोरेखित केला.दिल्ली पोलीस आमच्याकडे सोपवा - केजरीवालदिल्ली पोलिसांचे नियंत्रण दिल्ली सरकारच्या हाती देण्याची गरज व्यक्त करताना मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दोन बालिकांवरील सामूहिक बलात्काराच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि नायब राज्यपालांच्या भेटीची वेळ मागितली आहे. पंतप्रधानांनी स्वत: कारवाई करावी अथवा राजधानीतील कायदा व व्यवस्था आप सरकारच्या सुपुर्द करावी, असे आवाहन त्यांनी केले.अशा घडल्या घटना...1) निहाल विहारमध्ये शुक्रवारी रात्री दुचाकीवर आलेल्या दोन इसमांनी एका अडीच वर्षीय बालिकेचे अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार केले. एका बगिच्यात गंभीर अवस्थेत आढळलेल्या या बालिकेस स्थानिक लोकांनी इस्पितळात नेले. तिच्यावर उपचार सुरू आहेत. या प्रकरणी गुन्हा नोंदविण्यात आला असून, आरोपींचा शोध सुरू आहे.2) दुसऱ्या घटनेत पूर्णत: नशेत असलेल्या तिघांनी सायंकाळी आनंद विहारमधील पाच वर्षीय बालिकेवर बलात्कार केला.
बलात्कारांनी दिल्ली हादरली
By admin | Published: October 18, 2015 3:14 AM