संयुक्त राष्ट्र : जपानची राजधानी टोकिओनंतर 2क्14 मध्ये दिल्ली हे जगातील दुस:या क्रमांकाचे सर्वाधिक लोकसंख्या असलेले शहर झाले आहे. दिल्लीची लोकसंख्या 199क् नंतर दुपटीहून अधिकने वाढून 2.5 कोटींर्पयत पोहोचली आहे.
2क्14 च्या जागतिक शहरीकरण भवितव्य अहवालात भारतातील शहरी लोकसंख्या सर्वाधिक होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. यामध्ये भारत चीनलाही मागे टाकेल. संयुक्त राष्ट्राच्या या अहवालानुसार, जपानची राजधानी टोकिओ 3.8क् कोटी लोकसंख्येसह जगातील सर्वाधिक लोकसंख्येचे शहर आहे.
तथापि, टोकिओच्या लोकसंख्येत घट होण्याचे संकेत आहेत; मात्र तरीही 2क्3क् र्पयत हे जगातील सर्वात मोठे शहर म्हणून कायम राहिले. तेव्हा टोकिओची लोकसंख्या 3.7 कोटी एवढी असेल. जागतिक आरोग्य दिनानिमित्त शुक्रवारी हा अहवाल प्रकाशित करण्यात आला.
या अहवालानुसार सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या शहरांच्या यादीत मुंबई सहाव्या क्रमांकावर आहे. 2क्3क् र्पयत मुंबईची लोकसंख्या 2.8क् कोटी होईल आणि देशाची आर्थिक राजधानी जगातील चौथ्या क्रमांकाचे शहर बनेल. सध्या मुंबईची लोकसंख्या 2.1 कोटी एवढी आहे.
टोकिओ आणि नवी दिल्लीनंतर शांघायचे स्थान असून याची लोकसंख्या 2.3 कोटी इतकी आहे. मेक्सिको सिटी, मुंबई आणि साओ पाउलोची लोकसंख्या 2क्14 मध्ये जवळपास 21 कोटी एवढी होती.
या अहवालानुसार, 2क्14 ते 2क्5क् यादरम्यान शहरी लोकसंख्येत सर्वाधिक वाढ भारत, चीन आणि नायजेरिया या देशांत होईल. जागतिक शहरी लोकसंख्येत होणा:या अंदाजित वृद्धीत या देशांचा वाटा 37 टक्के एवढा राहील. आफ्रिका-आशिया खंडात सर्वाधिक शहरी लोकसंख्या वाढेल. भारतात सध्या 41 कोटी एवढी शहरी लोकसंख्या आहे. 2क्2क् मध्ये यात वाढ होऊन ती 81.4 कोटींवर जाईल. सध्या प्रथम क्रमांकावर असलेल्या चीनची शहरी लोकसंख्या 75.8 कोटी एवढी आहे. जगाच्या शहरी लोकसंख्येत भारत आणि चीन यांचा वाटा 3क् टक्के इतका आहे. अमेरिका, ब्राझील, इंडोनेशिया, जपान आणि रशिया यांच्यासह या दोन देशांत जगातील अध्र्याहून अधिक शहरी लोकसंख्या राहते. (वृत्तसंस्था)
4सध्या जगातील 54 टक्के म्हणजेच 3.9 अब्ज लोकसंख्या शहरी भागात राहते. 2क्5क् र्पयत हे प्रमाण वाढून 66 टक्के अर्थात 6.3 अब्ज होईल.
4भारतात 2क्5क् र्पयत शहरी लोकसंख्येत 4क्.4 कोटींची वाढ होईल. चीनच्या लोकसंख्येत 29.2 कोटी तुलनेत हा आकडा खूपच अधिक आहे. नायजेरियाच्या शहरी लोकसंख्येत 21.2 कोटींची वाढ होईल.
4195क् पासून ग्रामीण भागातील लोकसंख्या विस्तार खूप मंद गतीने झाला आहे. सध्या जगभरात 3.4 अब्ज लोकसंख्या ग्रामीण भागात राहते. तथापि, 2क्2क् नंतर जगाची ग्रामीण लोकसंख्या घटू लागेल आणि 2क्5क् र्पयत ही 3.2 अब्जावर पोहोचेल, असा अंदाज आहे. भारतात सध्या सर्वाधिक 85.7 कोटी लोक ग्रामीण भागात राहतात. यानंतर 63.5 कोटी लोकसंख्येसह चीन दुस:या क्रमांकावर आहे.