नवी दिल्ली- राजधानीतल्या राजकीय नाट्यावर सर्वोच्च न्यायालय आज निर्णय देणार आहे. गेल्या वर्षी 2 नोव्हेंबरपासून या प्रकरणावर सुनावणी सुरू होती. एका महिन्याच्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयानं 6 डिसेंबर 2017मध्ये निर्णय राखून ठेवला होता. न्यायालय सकाळी 10.30 वाजल्यापासून सुनावणी करणार आहे आणि 11 वाजेपर्यंत यावर निर्णय येण्याची शक्यता आहे.दिल्ली सरकार व केंद्र सरकारमध्ये अधिकारांवरून जबरदस्त चढाओढ सुरू आहे. आम आदमी पार्टी दिल्लीला पूर्ण राज्याचा दर्जा देण्याची मागणी करत आहे. त्यावर आज घटनापीठ निर्णय देणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या मते हे प्रकरण महत्त्वपूर्ण संवैधानिक व न्यायालयीन प्रक्रियेशी जोडलेलं आहे. त्यावर आज घटनापीठ निर्णय देईल. दिल्ली उच्च न्यायालयाच्या निर्णयाविरोधात केजरीवाल सरकारनं सर्वोच्च न्यायालयात 6 एप्रिलला अपील केलं होतं. त्यावर आज निर्णय होण्याची शक्यता आहे.
नवी दिल्लीतल्या राजकीय नाट्यावर आज पडणार पडदा ?
By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 9:15 AM