शहरं
Join us  
Trending Stories
1
आता पाण्याच्या थेंबा-थेंबासाठी तरसणार पाकिस्तान! पहलगामनंतर भारताचे 'वॉटर स्ट्राइक'; सिंधू जल करार स्थगित
2
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
3
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
4
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
5
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
6
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
7
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
8
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
9
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
10
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
11
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
12
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
13
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
14
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
15
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
16
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
17
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
18
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
19
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
20
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन

८ किमीसाठी मिळाले फक्त इतके पैसे; कॉलेजची फी भरण्यासाठी करतो काम, डिलिव्हरी बॉयची व्यथा

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 25, 2025 13:08 IST

विद्यार्थ्याने सांगितलं की तो त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी स्विगीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो.

दिल्लीत राहणाऱ्या एका २० वर्षीय विद्यार्थ्याची सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चा होत आहे. विद्यार्थ्याची एक रेडिट पोस्ट व्हायरल होत आहे. या पोस्टमध्ये विद्यार्थ्याने सांगितलं की तो त्याच्या कॉलेजची फी भरण्यासाठी स्विगीसाठी डिलिव्हरी बॉय म्हणून काम करतो. त्याने रेडिटवर 'आस्क-मी-एनीथिंग' असं सेशन आयोजित केलं होतं, ज्यामध्ये युजर्सनी त्याला टिप्स आणि त्याचे सर्वोत्तम आणि सर्वात वाईट अनुभव विचारले.

एका उत्तरात विद्यार्थ्याने सांगितलं की, तो पार्ट टाईम काम करून दरमहा ६,००० ते ८,००० रुपये कमवतो. त्याने शेअर केलेल्या स्क्रीनशॉटवरून असं दिसून आलं की १७ ते २३ फेब्रुवारी दरम्यान फक्त चार तास ४६ मिनिटे काम करून त्या विद्यार्थ्याने ७२२ रुपये कमावले. १०-१६ फेब्रुवारीच्या आठवड्यात १० तासांपेक्षा थोडे जास्त काम करून त्याने १,९९० रुपये कमावले. त्यानंतर ३ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या आठवड्यात १९.५ तासांपेक्षा जास्त काम करून त्याने ३,११७ रुपये कमावले आणि २७ जानेवारीपासून चार आठवड्यात ७,२०० रुपये पेक्षा जास्त कमावले. तो दररोज पेट्रोलवर सुमारे ₹१००-१५० खर्च करतो. 

विद्यार्थ्याने एक स्क्रीनशॉट शेअर केला आणि दाखवलं की त्याला २८ मिनिटांत ८.४ किलोमीटरसाठी फक्त  २३ रुपये मिळाले. यामध्ये १० रुपये 'प्रवासाचा खर्च' आणि १३ रुपये 'सर्ज बोनस' समाविष्ट होता. कामाच्या ठिकाणी आलेला एक वाईट अनुभव सांगताना, विद्यार्थ्याने सांगितलं की ऑर्डर देण्यास उशीर झाल्यामुळे एका ग्राहकाने त्याला मारहाण करण्याची धमकी दिली होती. मुलाने सांगितलं की त्याला उशीर झाला कारण रात्र होती आणि ग्रीन पार्क परिसरातील त्या ठिकाणी पोहोचण्यासाठी गुगल मॅप्सने दाखवलेले मार्ग बंद होते.

एका हृदयस्पर्शी आठवणीबद्दल बोलताना, मुलाने सांगितले की एकदा त्याने रुग्णालयात ७-१० वर्षांच्या मुलीला मिठाई दिली, ती आनंदाने नाचू लागली. मुलीने त्याला सांगितलं की तिच्या आईने नुकताच तिच्या भावाला जन्म दिला आहे आणि तिने त्याला १०० रुपयांची टीप देखील दिली होती. त्याने स्विगीसोबत पार्ट टाईम काम करायला सुरुवात केली कारण शॅडोफॅक्ससाठी वस्तू पोहोचवणाऱ्या एका व्यक्तीला पाहून त्याला उत्सुकता निर्माण झाली. सुरुवातीला काम करण्याचा माझा एकमेव उद्देश हा पॉकेट मनी कमावणे हाच होता. पण नंतर मी माझ्या कॉलेजची फी भरण्यासाठी काम करू लागलो.

टॅग्स :Swiggyस्विगीSocial Viralसोशल व्हायरल