नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीत मथुरा रोडवर एका बसमध्ये पाच किशोरवयीन मुलांनी बीकॉमला श्किणाºया विद्यार्थ्यांची चाकूने भोसकून हत्या केली. त्याला भोसकून ते पाचही विद्यार्थी पळून गेले. पण बसमध्ये ही भयंकर घटना घडत असताना या हल्लेखोर मुलांना बसमधील प्रवाशांनी वा कंडक्टरने रोखले नाही. अंगावर काटा आणणाºया या घटनेबद्दल संताप व्यक्त होत आहे. पोलिसांनी पाचही विद्यार्थ्यांना पकडले आहे.या घटनेतील मृत विद्यार्थ्याचे नाव आहे मोहम्मद अनस (१८). ही घटना शुक्रवारी दुपारी पावणेचारच्या सुमारास घडली. मोहम्मद अनस हा अल-फलाह विद्यापीठात बी कॉमचे शिक्षण घेत होता. या पाचमुलांनी आपला मोबाइल चोरला असल्याचा संशय मोहम्मद अनस याला होता. त्यामुळे तो त्यांची तपासणी करत असताना त्याला भोसकण्यात आले.हे सर्वजण एकाच स्टॉपवरून बसमध्ये बसले. जेव्हा अनसने आपला मोबाइल शोधण्यासाठी या पाच मुलांचे खिसे तपासण्याचा प्रयत्न केला, तेव्हा त्या पाच जणांपैकी एकाने त्याच्या गळ्यावर चाकूने मारले. या झटापटीनंतर ही पाचही मुले बसमधून उड्या मारुन पळून गेली. मोहम्मदला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. पण, तोपर्यंत त्याचा मृत्यू झाला होता.कोणीच मदतीला नाहीया बसमधून किमान ४० प्रवासी प्रवास करत होते. पण, कोणीच हस्तक्षेप न केल्याबद्दल अनसचे वडील भोलू खान यांनी खंत व्यक्त केली. ते म्हणाले की, अनसला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात कोणी तत्परता दाखविली नाही.अनस हा कंडक्टरच्या सीटच्या जवळच बसला होता. पण कंडक्टरनेही त्याला वाचवण्याचा प्रयत्न केला नाही. हे सर्व इतक्या अचानक झाले की, मदत करण्यास वेळच मिळाला नाही, असे कंडक्टरचे म्हणणे आहे.
दिल्लीत विद्यार्थ्याची बसमध्ये भोसकून हत्या, पाच मुलांना पोलिसांनी पकडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 26, 2017 12:00 AM