शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांना काँग्रेसने दोनदा मुख्यमंत्रीपद दिले पण पक्ष संकटात असताना ते भाजपात गेले"
2
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
3
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
4
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
5
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
6
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
7
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
8
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
9
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
10
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
11
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
12
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
13
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
14
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
15
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
16
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
17
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
18
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
19
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
20
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...

धक्कादायक! Sulli Deals अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचा 'लिलाव'? FIR दाखल; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 13, 2021 1:27 PM

'सुल्‍ली' एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीम महिलांसाठी करतात. 'सुल्‍ली डील्‍स' गिटहबवरील एक अ‍ॅप आहे.

नवी दिल्‍ली - एका अ‍ॅपवर मुस्लीम तरुणींचे फोटो अपलोड करून त्यांचा लिलाव करण्यात येत असल्याचे प्रकरण समोर आले आहे. 'Sulli Deals' अ‍ॅपच्या माध्यमाने 80 हून अधिक महिलांची 'बोली' लावण्यात आली आहे. काही पीडित तरुणींनी यासंदर्भात दिल्‍ली पोलिसांत तक्रार दाखल केली, यानंतर सायबर सेलने एफआयआर दाखल केली आहे. यासंपूर्ण प्रकरणावरून ट्विटरवरही मोठा गोंधळ उडाला आहे. 'रितेश झा' नावाच्या व्यक्ती भोवती मंगळवारी ट्रेंड्स फिरत होते. या व्यक्तीचे नाव यापूर्वीही ऑनलाइन लैंगिक गुन्ह्यांमध्ये समोर आले आहे. (Delhi Sulli deals app attack on muslim women police registers fir arrest ritesh jha trends on twitter)

काय आहे सुल्‍ली डील्‍स?'सुल्‍ली' एक टर्म आहे, ज्याचा वापर काही लोक मुस्लीममहिलांसाठी करतात. 'सुल्‍ली डील्‍स' गिटहबवरील एक अ‍ॅप आहे. ते ओपन केल्यानंतर यूझर्सना मेसेज दिसेल, ‘Find your Sulli Deal of the Day’. पुढे गेल्यानंतर आपल्याला रँडमली कुण्या मुस्लीम महिलेचा फोटो दिसेल. जी त्यांच्या सोशल मिडिया अकाउंटवरून घेतलेली असेल. खरे तर, याच्याशी संबंधित लोकांनी ट्विटरवरवर 'डील ऑफ द डे' म्हणून फोटो शेअर करायला सुरुवात केल्यानंतर, या अ‍ॅपची चर्चा सुरू झाली. आता हे अ‍ॅप GitHub ने हटवले आहे.

कुठलीही परवानगी न घेता अपलोड करण्यात आले महिलांचे फोटो -'सुल्ली फॉर सेल' नावाने एक ओपन सोर्स अ‍ॅप तयार करण्यात आले. यात महिलांच्या ट्विटर हँडलवरून माहिती आणि पर्सनल फोटोज चोरी करून टाकण्यात आले. यानंतर यांचा सार्वजनिकरित्या लिलाव करण्यात आला. यालाच 'सुल्‍ली डील्‍स' म्हटले गेले. हे अ‍ॅप लोकांना, 'फाइंड युअर सुल्ली डील ऑफ द डे', असे नोटिफिकेशन पाठवत होते. या अ‍ॅपवर शेकडो महिलांचे फोटो त्यांची परवानगी न घेता अपलोड करण्यात आले आहेत. यासंदर्भात तक्रार येताच, GitHub ने अ‍ॅप तयार करणाऱ्या यूझरला सस्‍पेंड केले आहे. 

कोण आहे रितेश झा? होतेय अटक करण्याची मागणी -यापूर्वी, रितेश झाचे नाव गेल्या वर्षी चर्चेत आले होते. तेव्हा काही कॉल रिकॉर्डिंग्‍स लीक झाल्या होत्या. यात त्याने कथितपणे मान्य केले होते, की त्याने घरात काम करणाऱ्या मुस्लीम महिलेचे लैंगिक शोषण केले आणि त्याचा व्हिडिओ इंटरनेटवर टाकला. यूट्यूबवर Liberal Doge नावाच्या चॅनलवर मुस्लीम महिलांचे ईदचे फोटो सेक्‍सुअलाइज करण्यात आले आले. यातही रितेशचे नाव आले होते. 

 

टॅग्स :WomenमहिलाMuslimमुस्लीमIslamइस्लामPoliceपोलिसCrime Newsगुन्हेगारी