नवी दिल्ली - दिल्लीतील धौला कुआं रिंग रोड परिसरात ISIS च्या एका दहशतवाद्याला पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. चौकशीदरम्यान या दहशतवाद्याने आता धक्कादायक माहिती दिली आहे. दिल्ली आणि उत्तर प्रदेशमध्ये राम मंदिर होत असलेल्या ठिकाणी घातपात करण्याचा मोठा डाव असल्याची माहिती समोर आली आहे. अबू युसूफ असं या दहशतवाद्याचं नाव आहे. दहशतवाद्याकडून मोठ्या प्रमाणात IED स्फोटकांचा साठा जप्त करण्यात आला आहे.
अबू युसूफने राम मंदिर आणि दिल्लीत घातपाताचा मोठा डाव असल्याचं सांगितलं आहे. तसेच तो अफगाणिस्तानमधील काही साथीदारांच्या संपर्कातही होता. या दोन ठिकाणी मोठे हल्ले घडवून आणण्याचा डाव असल्याची प्राथमिक माहिती समोर आल्यानंतर पोलिसांनी अलर्ट जारी केला आहे. पोलीस अधिक तपास करत आहेत. गुप्तचर यंत्रणेकडून यासंदर्भात माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे पोलीस यंत्रणा सतर्क होती आणि त्यांनी सर्च ऑपरेशन सुरू केलं. मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीमध्ये चकमक सुरू झाली असून ISISचा एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली.
दिल्ली पोलिस स्पेशल सेलचे डीसीपी प्रमोदसिंग कुशवाह यांनी दिलेल्या माहितीनुसार, धौला कुआंमध्ये दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने केलेल्या कारवाईनंतर ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक करण्यात आली. आणखी काही दहशतवाद्यांना अटक करण्यात येऊ शकते. दिल्ली पोलिसांनी दहशतवाद्यांचा मोठा कट उधळून लावला आहे. IED स्फोटकांचा साठा जप्त केला आहे. अबू युसूफ या दहशतवाद्याकडून दोन IED स्फोटकं जप्त करण्यात आली आहेत. त्याच्यासोबत आणखी एक साथीदार असल्याची माहिती मिळत आहे. मात्र चकमकीदरम्यान तो फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत
अयोध्येत राम जन्मभूमीवर मंदिर उभारणीला सुरुवात झाली आहे. तर दुसरीकडे पाकिस्तान मोठा कट आखत असल्याचं वृत्त काही दिवसांपूर्वी समोर आलं होतं. पाकिस्तान राम मंदिर उभारणीचा बदला घेण्यासाठी भारतातील हिंदू नेत्यांवर हल्ला करण्याचा कट आखत आहे. यासंदर्भात, गुप्तचर संस्थांकडून तीन राज्यांना अलर्ट करण्यात आहे. टाइम्स नाऊने दिलेल्या वृत्तानुसार, इंटेलिजेंस ब्यूरोने वेगवेगळ्या राज्यांना अलर्ट जारी करताना म्हटले होते, की पाकिस्तान भारतात राहणाऱ्या आंतरराष्ट्रीय गँगशी संबंधित असलेल्या आरोपींचा वापर करून, हिंदू नेत्यांना मारण्याचा कट आखत आहे. टाइम्स नाऊकडे या अलर्टची कॉपी असल्याचेही समजते.
महत्त्वाच्या बातम्या
देशी युद्धनौका INS Vikrant मारणार अथांग समुद्रात सूर; 26 लढाऊ विमानांसह चाचणी सुरू
मोबाईल बँकिंगमध्ये फ्रॉडचा धोका, SBI ने दिला खातेदारांना मोलाचा सल्ला
19 वर्षांचं नातं काही सेकंदांत तुटलं! WhatsApp वरून दिला पत्नीला तलाक
मोठी कारवाई! दिल्लीच्या धौला कुआंमध्ये चकमक, ISIS च्या एका दहशतवाद्याला अटक, स्फोटकांचा साठा जप्त