नवी दिल्ली, दि. 10 - स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्लीतून अल कायदाच्या एका दहशतवाद्याला अटक केली आहे. हा दहशतवादी नेपाळला पळून जाण्याचा प्रयत्न करत होता. मिळालेल्या माहितीनुसार, रजा उल अहमद असे अटक करण्यात आलेल्या दहशतवाद्याचं नाव आहे. तो भारतात बनावट नोटांचं रॅकेट चालवत असल्याचे समोर आले आहे. बांगलादेश येथील अंसार बांग्ला या दहशतवादी संघटनेचा तो सदस्य आहे. अंसार बांग्ला ही दहशथवादी संघटना अल कायदाशी जोडलेलं आहे.दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गेल्या अनेक दिवसांपासून दिल्लीमध्ये राहत होता. माध्यमांच्या वृत्तानुसार, रजा अहमतला पश्चिम बंगाल पोलिसांच्या हाती स्वाधिन केलं आहे. रजा अहमद विरोधात पश्चिम बंगालमध्ये अनेक गुन्हे दाखल केलेले आहेत. पोलिस रजा अहमदची कसून चौकशी करत आहेत. त्याच्याकडून देशात आणखी दहशतवादी लपलेले आहेत का? याबद्दल माहिती घेत आहेत.अंसार बांग्ला ही बांगलादेश मधील मोठी दहशतवादी संघटना आहे. या दहशतवादी संघटनेनं अनेक लेखकांच्या हत्या केलेल्या आहेत. दिल्ली पोलिस आणि गुप्तहेर संघटनेच्या मते या दहशतवादी संघटनेशी जोडले गेलेले लोक बनावट कागदपत्राच्या आधारे भारतात प्रवेश केला आहे. गेल्या आठवड्यात उत्तरप्रदेश पोलिसांनी अंसार बांग्लाच्या एका दहशतवाद्याला अटक केली होती.
स्वातंत्र्यदिनापूर्वी दिल्लीत दहशतवाद्याला अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2017 1:52 PM