नवी दिल्ली - दिवाळी हा सण देशभरात मोठ्या उत्साहाने साजरा केला जात असतानाच यंदा सर्वोच्च न्यायालयाने फटाके वाजविण्यावर काही निर्बंध घातले आहेत. तसेच ग्रीन फटाक्यांचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र दिल्लीमध्ये ‘ग्रीन’ फटाके विक्रीसाठी उपलब्ध नसल्याने व्यापाऱ्यांनी भाजीफटाके घेऊन अनोख्या पद्धतीने याचा विरोध केला आहे.
व्यापारी संघटनेचे अध्यक्ष एच. एस. छाब्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'ग्रीन’ फटाके कुठे मिळतात हे कुणालाच माहिती नाही असे सांगितले. आम्ही एसएचओ ग्रीन फटाके कुठे मिळतात याची यादी द्यावी अशी विनंती केली होती, मात्र त्यांनी याबाबत यादी दिली नाही'. बाजारात पर्यावरणपूरक फटाकेच नसतील तर ते आणणार कोठून असा सवालही छाब्रा यांनी केला आहे.