शहरं
Join us  
Trending Stories
1
"५० पैकी एकजरी पडला तर राजकारण सोडेन"; सुषमा अंधारेंनी करून दिली एकनाथ शिंदेना आठवण
2
“उद्या दुपारी १२ वाजता महायुती हद्दपार झालेली दिसेल, मी सत्तेतील आमदार असेन”: विजय वडेट्टीवार
3
सत्तास्थापनेसाठी आम्हाला 'त्यांची' गरज नाही, पण..; रावसाहेब दानवेंचा मोठा दावा
4
महायुती की मविआ? कोणाला पाठिंबा देणार? हितेंद्र ठाकूरांचा निर्णय झाला; दिले सूचक संकेत
5
IPL Auction 2025: MIला ८, CSKला ७... कोणत्या टीमला किती परदेशी खेळाडू विकत घेता येणार?
6
  राणेंचा दबदबा की ठाकरे गट बाजी मारणार? असा आहे सिंधुदुर्गाचा कल
7
राहुल गांधी, खर्गेंना विनोद तावडेंची कायदेशीर नोटीस; पैसे वाटप प्रकरण तापणार
8
“युगेंद्र पवार आमदार होणार, महाविकास आघाडीला १६० जागा मिळणार”; जितेंद्र आव्हाडांचा दावा
9
नेत्रदिपक भरारी! शेतकऱ्याच्या लेकीने रचला इतिहास; अवघ्या १९ व्या वर्षी झाली पायलट
10
“विधानसभेच्या निकालानंतर शरद पवार महायुतीसोबत येऊ शकतात”; नारायण राणेंचे सूचक विधान
11
ईव्हीएम, कर्मचाऱ्यांसाठी वापरलेल्या एसटी बसमध्ये सापडली 500 रुपयांची बंडले; कोणाची? 
12
जास्त जागा त्याचा मुख्यमंत्री? मविआचा फॉर्म्युला काय ठरला? काँग्रेस नेत्यांनी सगळेच सांगितले
13
AUS vs IND Day 1: बुमराहचा 'चौकार'! २ सत्र गाजवणारा ऑस्ट्रेलियन संघ दिवसाअखेर बॅकफूटवर
14
समंथा रुथ प्रभू बनली सर्वात लोकप्रिय भारतीय सेलिब्रिटी; करिना, दीपिकालाही टाकलं मागे
15
ए आर रहमान यांचं गिटारिस्टसोबत अफेअर? चर्चांवर लेकानेच केलं भाष्य; म्हणाला, "निराश झालो..."
16
५१ चौकार, २९७ धावांचा पाऊस... वीरेंद्र सेहवागचा मुलगा आर्यवीरचा धुमधडाका, पण Ferrari थोडक्यात हुकली
17
घडामोडींना वेग! मनसे नेते बाळा नांदगावकरांनी घेतली देवेंद्र फडणवीसांची भेट; बैठकीत काय घडले?
18
शरद पवारांचा एक्झिट पोलचा आकडा काय? शेवटपर्यंत मतमोजणी केंद्र न सोडण्याचे आदेश
19
जिद्दीला सलाम! आई-बाबांचा मृत्यू; दोन्ही पायांनी दिव्यांग असूनही करतो डिलिव्हरी बॉयचं काम
20
माहिममध्ये मोठा खेळ झाला? भाजपच्या नेत्याचा निवडणुकीनंतर ठाकरे गटात प्रवेश 

दिल्ली विद्यापीठात सावरकरांच्या नावानं उभारलं जाणार महाविद्यालय; वाजपेयींच्या नावानंही असणार सेंटर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2021 11:38 PM

दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

नवी दिल्ली- दिल्ली विद्यापीठात स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्य नावाणे महाविद्यालय उभारण्यात येणार आहे. या प्रस्तावाला दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेने मंजुरीही दिली आहे. याच बरोबर, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांच्या नावाने महाविदयालय-सेंटर्स असणार आहेत. (Delhi university clears proposal to name new college after savarkar vc justifies the move)दिल्ली विद्यापीठाच्या शैक्षणिक परिषदेची बैठक बुधवारी पार पडली. या बैठकीत नव्या संस्थांच्या नावांना मान्यता देण्यात आली आहे. यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सुषमा स्वराज आणि अरुण जेटली यांसारख्या भाजप नेत्यांच्या नावांचा समावेश आहे.

या नेत्यांच्या नावानेही असतील महाविद्यालय-सेंटर्स -शैक्षणिक परिषदेच्या बैठकीत ज्या नावांना मंजुरी देण्यात आली आहे, त्यांत देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री ब्रह्म प्रकाश आदी नावांचाही समावेश आहे.दिल्ली विद्यापीठाचे कुलगुरू प्रोफेसर पी. सी. जोशी यांनी एका हिंदी वृत्त संस्थेशी बोलताना सांगितले, की ज्या नावांना मंजुरी मिळाली आहे, ती नावे समाजातील त्यांच्या योगदानाच्या आधारे प्रस्तावित करण्यात आली होती. तसेच, विहित प्रक्रियेचे पालन करूनच, परिषदेने या नावांना मंजुरी दिली आहे.

दिल्लीत दोन नवी महाविद्यालये -दिल्लीत दोन नवी महाविद्यालये उभारण्यात येत आहेत. पहिले महाविद्यालय दक्षिण दिल्लीतील भाटी गावात, तर दुसरे महाविद्यालय दिल्लीतील नजफगड गावाजवळील रौशनपुरा येथे उभारण्यात येईल. या दोन महाविद्यालयांशिवाय चार सुविधा केंद्रांचे लोकार्पणही करण्यात येणार आहे. या चार सुविधा केंद्रांपैकी दोन, या दोन्ही महाविद्यालयांच्या परिसरात सुरू करण्यात येणार आहेत. तसेच उर्वरित दोन शाहबाद डेअरी आणि पूर्व दिल्ली क्षेत्रात सुरू केली जाणार आहेत. तसेच येथे एक नवीन लॉ कॅम्पसही सुरू करण्याचा विचार आहे.

सावरकर स्वातंत्र्य सेनानी होते -प्रो. पी. सी. जोशी यांनी हा निर्णय योग्य असल्याचे म्हणत, सावरकर हे प्रसिद्ध स्वातंत्र्य सेनानी होते. अंदमान येथे आजही सेल्यूलर जेल आहे, जेथे त्यांनी काळ्या पाण्याची शिक्षा भोगली होती. अंदमान येथे गेलो असता, त्या सेल्यूलर जेलला भेट दिली होती. तेव्हा स्वातंत्र्यसंग्रामातील त्यांचे योगदान अधिक चांगल्या प्रकारे जाणवले, असे प्रो. जोशी यांनी नमूद केले. तसेच, या स्वातंत्र्यसंग्रामात सरदार वल्लभभाई पटेल, दिल्लीचे पहिले मुख्यमंत्री चौधरी ब्रह्मप्रकाश आणि महात्मा ज्योतिबा फुले यांचेही योगदान तितकेच मोठे आणि महत्त्वाचे आहे, असेही प्रो. जोशी यांनी म्हटले आहे. ही नावे एक्झिक्यूटिव्ह काउंसीलसमोर अंतिम निर्णयासाठी ठेवण्यात येतील, असेही त्यांनी सांगितले.

दरम्यान, दिल्ली विद्यापीठातील अनेकांनी स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्या नावाला विरोध दर्शवला आहे. विद्यापीठाच्या एक्झिक्यूटिव्ह काउंसिलचे माजी सदस्य राजेश झा यांनी म्हटले आहे, की विद्यापीठ प्रशासनाने शैक्षणिक परिषदेला अंधारात ठेऊन हा निर्णय घेतला आहे. मात्र, आम्ही याला विरोध करू.

टॅग्स :Vinayak Damodar Savarkarविनायक दामोदर सावरकरdelhiदिल्लीBJPभाजपाAtal Bihari Vajpayeeअटलबिहारी वाजपेयीSushma Swarajसुषमा स्वराजArun Jaitleyअरूण जेटली