नवी दिल्ली - दिल्लीतील हिसेंमुळे झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाने एक कमिटी स्थापन केली आहे. या हिसेंत आपलं घर गमावणाऱ्या कुटुंबांना भाजपकडून साहित्य वाटप करण्यात येणार आहे. भाजपचे दिल्लीचे प्रदेशाध्यक्ष मनोज तिवारी यांनी या संदर्भात माहिती दिली आहे. मनोज तिवारी यांनी गुरुवारी सांगितले की, दिल्लीच्या एका भागात अत्यंत निंदणीय हिंसा झाली आहे. अनेकांना यामध्ये जीव गमवावा लागला आहे. तर अनेक घरांचे आणि दुकानांचे मोठे नुकसान झाले आहे. दिल्लीतील अनेक भागातील चित्र भयावह होतं. या घटनांचे व्हिडिओ लोकांच्या मोबाईलमध्ये फिरत आहेत. यामध्ये पोलिसांवर हल्ला होताना दिसत आहे. यामध्ये माणुसकीची हत्या झाल्याचे तिवारी यांनी म्हटले.
दिल्लीत झालेल्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर आम्ही दररोज 200 घरांमध्ये पोहोचण्याचा प्रयत्न करणार आहोत. प्रत्येक कुटुंबासाठी 5 हजार रुपये निश्चित करण्यात आले आहेत. यामध्ये साहित्याचे एक पॉकेट देण्यात येणार आहे. ज्यामध्ये 700 ते 800 रुपयांचे साहित्य असेल आणि उर्वरित रक्कम त्या कुटुंबाला देण्यात येईल. यामध्ये विशिष्ट एका समूदायाला मदत करणार नसल्याचे तिवारी यांनी स्पष्ट केले आहे.
भाजपकडून मदत देण्यास उशीर का, यावर तिवारी म्हणाले, तयारीसाठी कालावधी लागतो. त्यामुळे उशीर झाला आहे.