नवी दिल्ली : सीएए कायद्याविरोधातील दिल्लीतील हिंसाचाराची झळ आता देशभरात बसू लागली असून सीबीएसई बोर्डाला 10 वी आणि 12 वीच्या परीक्षा रद्द कराव्या लागल्या आहेत. 28 आणि 29 फेब्रुवारीला होणारे पेपर बोर्डाने रद्द केले आहेत.
सीबीएसईकडून मिळालेल्या माहितीनुसार, हिंसाचारामुळे दिल्लीतील मुलांच्या सुरक्षेला धोका आहे. यामुळे दहावी, बारावी बोर्डाच्या परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी बोर्डाने हे पाऊल उचलले आहे. उत्तर पूर्व दिल्लीमध्ये गेल्या ४ दिवसांपासून दंगली होत आहेत. मोठ्या प्रमाणावर जाळपोळ, गोळीबार आणि हत्यांचे सत्र सुरू आहे. आज कोणतीही अनुचित घटना घडलेली नसली तरीही आरपीएफच्या 45 तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
या हिंसाचारामध्ये 34 हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. परिस्थिती नियंत्रणात असल्याचा दावा पोलिसांनी केला असून वातावरण निवळत आहे. मात्र, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी 28 फेब्रुवारी आणि 29 फेब्रुवारीला होणारे पेपर पुढे ढकलण्यात आले आहेत. हे बदल केवळ हिंसाचारग्रस्त दिल्लीच्या भागातच करण्यात आल्याचे पत्रामध्ये स्पष्ट करण्यात आले आहेत. यामुळे या बदलाचा परिणाम देशभरात होणार नाही.
बुधवारी सीबीएसईच्या 10 वीचा इंग्रजी विषयाचा पेपर झाला होता. परीक्षेला सोडण्यासाठी पालक शाळेमध्ये आले होते. तसेच पेपर संपेपर्यंत शाळेबाहेरच थांबून होते. यामुळे पालकांमध्ये हिंसाचाराची भीती पसरली होती. अशा परिस्थितीत विद्यार्थी परीक्षा देऊ शकत नसल्याचे पालकांनी सांगितले होते.
Delhi Voilence : 'दुसऱ्यांना वाचवण्याच्या नादात माझ्या मुलाने जीव गमावला'
'दंगली होतच राहतात, त्या जगण्याचा एक भागच'; हरियाणाचे मंत्री बरळले