नवी दिल्लीः नागरिकत्व सुधारणा कायद्यावरून उत्तरपूर्व दिल्लीतल्या वेगवेगळ्या भागात हिंसाचार उफाळून आला आहे. दिल्लीत हिंसाचार माजल्यानंतर 72 तासांपर्यंत दिल्ली पोलिसांनी केवळ बघ्याची भूमिका घेतली होती. या काळात 18 जणांचा बळी गेला होता. यामध्ये एका हेड कॉन्स्टेबलचाही समावेश असून, शेकडो जण रुग्णालयात दाखल आहेत. अनेकांना गोळी लागली आहे. त्यानंतर दिल्ली उच्च न्यायालयात एक याचिका दाखल झाली असून, त्यावर सुनावणी झाली आहे.माकपा नेते वृंदा करात यांच्या तक्रारीनंतर अनुराग ठाकूर, प्रवेश वर्मा यांच्याविरोधात प्राथमिक गुन्हा दाखल करावा की नाही, यावर न्यायालय 28 फेब्रुवारीला निर्णय देणार आहे. यादरम्यान पोलीस आयुक्तांचं प्रतिनिधित्व करण्याच्या मुद्द्यावर सॉलिसीटर जनरल आणि दिल्ली सरकारचे अधिवक्त्यांमध्ये चर्चा झाली. न्यायालयानं या प्रकरणात तीन ते पाच तासांच्या दरम्यान तीनदा सुनावणी घेतली आहे. तिसऱ्यांदा सुनावणीदरम्यान न्यायालयानं केंद्र आणि राज्य दोघांच्याही प्रतिनिधींना पीडित आणि त्यांच्या कुटुंबीयांना खासगी स्वरूपात भेटण्यास सांगितलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'