नवी दिल्ली - प्रजासत्ताक दिनप्रसंगी ट्रॅक्टर रॅलीदरम्यान झालेल्या हिंसाचारात 300 हून अधिक पोलीस कर्मचारी जखमी झाले आहेत. हे पोलीस कर्मचारी लाल किल्ला, आयटीओ आणि नांगलौईसह इतर ठिकाणी झालेल्या हिंसाचारात जखमी झाले आहेत. लाल किल्ला परिसरात झालेल्या हिंसाचारासंदर्भात आज पोलीस प्रशासनाकडून पत्रकार परिषदही घेण्यात येणार असल्याचे समजते. सध्या दिल्ली पोलीस आयुक्त वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक करत आहेत.
पोलीस आयुक्तांची वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत बैठक सुरू -सांगण्यात येते, की दिली पोलीसचे एसएचओ बुराडी यांच्या डोक्याला जखम झाली आहे. एसएचओ वजीराबाददेखील गंभीर जखमी झाले असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. डीसीपी नॉर्थमधील स्टाफ अधिकारीही जखमी झाले आहेत. हिंसेदरम्यान उत्तर दिल्लीमध्ये 41 पोलीस कर्मचारी, पूर्वी दिल्लीत 34, पश्चिमी दिल्लीत 27, द्वारका येथे 32, बाहेरील उत्तरेकडील जिल्ह्यांत 12, शाहदरा येथे 5, दक्षिण जिल्ह्यात 4, तर दिल्ली बाहेरील जिल्ह्यांत 75 पोलिसकर्मचारी जखमी झाले आहेत.
आतापर्यंत 22 एफआयआर दाखल -हिंसाचारानंतर राजधानी दिल्लीला छावणीचे स्वरूप आले आहे. दिल्लीमध्ये पोलीस दलाबरोरच सीआरपीएफच्या 15 तुकड्यात तैनात करण्यात आल्या आहेत. हिंसाचारादरम्यान एका आंदोलक शेतकऱ्याचा मृत्यूही झाला. या हिंसाचारानंतर पोलिसांनी 22 एफआयआर नोंदवल्या आहेत. या हिंसाचाराशी संबंधित प्रकरणांचा तपास क्राइम ब्रांच, स्पेशल सेलकडे सोपविण्यात आला आहे.
सीसीटीव्ही फुटेजच्या माध्यमाने पोलीस तपास -दिल्ली पोलीस आता सीसीटीव्ही फुटेडच्या माध्यमाने निदर्शनकर्त्यांचा शोध घेत आहे. यासाठी, लाल किल्ला, नांगलोई, मुकरबा चौक आणि सेंट्रल दिल्लीतील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज काढण्यासाठी स्पेशल सेल आणि क्राइम ब्रांचची मदत घेतली जात आहे. यात पोलिसांवर हल्ला करणाऱ्यांवर, लाल किल्ल्यावर चढणाऱ्यांवर आणि सरकारी संपत्तीचे नुकसान करणाऱ्यांवर पोलिसांचे लक्ष असेल. याच बरोबर, ज्यां नेत्यांनी शेतकऱ्यांना भडकावले अशा नेत्यांवरही पोलिसांची नजर असणार आहे.