Violence In Jahangirpuri: १६ एप्रिल रोजी हनुमान जयंतीनिमित्त (Hanuman Jayanti) निघालेल्या मिरवणुकीदरम्यान दिल्लीच्या जहांगीरपुरीमध्ये (Delhi Jahangirpuri Violence) हिंसाचार झाल्याची घटना घडली. त्यात झालेल्या दगडफेक आणि वाहनांच्या तोडफोडीदरम्यान नागरिकांसह अनेक पोलीस जखमी झाले. यानंतर पोलिसांकडून काही जणांना अटकही केली. या प्रकरणाची गृहमंत्री अमित शाह आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही दखल घेतली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी एकर गंभीर आरोप केला आहे.
“रामनवमीच्या वेळी जातीय हिंसाचार झाल्याचं आम्ही कधी ऐकलं नाही. भाजप आणि त्यांच्या काही संस्था यामागील कारण आहेत. दिल्लीची कायदा सुव्यवस्था ही केंद्र सरकारच्या अखत्यारित येते,” असं शरद पवार म्हणाले. बंगळुरूमध्ये माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी यावर भाष्य केलं.
सोमवारी काय झालं?शनिवारच्या हिंसाचारानंतर पोलीस एका महिलेला चौकशीसाठी घेऊन गेले होते, असे सांगण्यात येत आहे. यानंतर सोमवारी जहांगीरपुरी परिसरातील सुमारे ५० महिलांनी निषेध आणि दगडफेक सुरू केली. पोलिसांनी ज्या महिलेला ताब्यात घेतले आहे, ती आरोपी सोनूची पत्नी असल्याचे सांगितले जात आहे. सोनूने शनिवारी गोळीबार केला होता. महिलेला पोलीस चौकशीसाठी नेल्यानंतर सोमवारी वेगवेगळ्या घरांच्या छतावरुन पोलीस पथकावर दगडफेक करण्यात आली.