नवी दिल्ली - 26 जानेवारीला दिल्ली आणि लाल किल्ल्यावर झालेल्या उपद्रवाचा कट आधीपासून ठरवण्यात आला होता. असा धक्कादायक खुलासा दिल्ली पोलीस क्राईम ब्रांचच्या SIT चौकशीतून समोर आला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, उपद्रव करण्यासाठी काही विशेष गटांना लाल किल्ला आणि आयटीओवर एकत्र होण्यास सांगण्यात आले होते. यांचा उद्देश आंदोलकांमध्ये उपस्थित राहून उपद्रव सुरू करणे आणि नंतर आंदोलन कर्त्यांना उपद्रवात सामील करणे, असा होता. (script of the january 26 violence was prepared before)
इकबाल सिंगच्या चिथावनीवरून तोडला गेला लाहौर दरवाजा - पोलिसांतील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी उपद्रवी इकबाल सिंगवर 50 हजार रुपयांचे बक्षी ठेवले आहे. तो या कटातील महत्वाचा मोहरा असल्याचे सागंण्यात येत आहे. त्यानेच लाल किल्ल्यात जमाव जमवला आणि त्यांना लाहोर दरवाजा तोडण्यासाठी भडकावले. यानंतरच उपद्रवी जमावाने लाल किल्ल्याचा लाहोर दरवाजा तोडला. तसेच लाल किल्ल्यावर सर्वात वर आपल्या धर्माचा झेंडा फडकावण्याची त्यांची इच्छा होती.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ज्या व्हिडिओमध्ये इकबाल सिंग दिसत आहे, त्यावरूनही तो जमावाला भडकावत असल्याचे स्पष्ट होत आहे. एवढेच नाही, तर त्याच्या सोबत इतरही काही लोक उपस्तित होते. ते सर्व जण जमावाला भडकावण्याचेच काम करत होते.
हिंसाचार प्रकरणात 124 हून अधिक लोकांना अटक -दिल्ली पोलिसांच्या क्राइम ब्रांचची SIT 26 जानेवारीला झालेल्या हिंसाचाराची चौकशी करत आहे. या प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत तब्बल 124 जणांना अटक केली आहे. तर 44 FIR दाखल करण्यात आल्या आहेत. संबंधित 44 प्रकरणांपैकी 14 प्रकरणांचा तपास SIT करत आहे. या शिवाय पोलिसांकडून 70 हून अधिक लोकांचे फोटोही जारी करण्यात आले आहेत.
ग्रेटाचं 'ते' ट्विट -पर्यावरण संवर्धनासाठी काम करणाऱ्या ग्रेटा थनबर्गने शेतकरी आंदोलनाचे सनर्थन करणारे ट्विट केले. भारतात सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनामागे आम्ही एकजुटीने उभे आहोत, असे ग्रेटाने ट्विटमध्ये म्हटले होते. याच बरोबर तिने आणखी एक ट्विट केले होते. या सोबत तीने एक डॉक्युमेंटदेखील शेअर केले होते. यात भारत सरकारवर आंतरराष्ट्रीय दबाव निर्माण करण्यासाठीची रणनीती नमूद करण्यात आली होती. तसेच आंदोलनाचे प्लॅनिंगही करण्यात आले होते. भारतावर पाच टप्प्यांमध्ये दबाव आणण्याचा उल्लेख यामध्ये होता. मात्र, चूक लक्षात आल्यानर ग्रेटाने हे ट्विट थोड्याच वेळात डिलीट केले.