नवी दिल्लीः दाक्षिणात्य सुपरस्टार रजनीकांत यांनी दिल्लीत भडकलेल्या हिंसेवरून केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. दिल्लीत समाजकंटकांनी जो काही हिंसाचार घडवला आहे, त्यात दिल्ली पोलिसांच्या हेड कॉन्स्टेबलसह 20 जणांचा मृत्यू झाला आहे. दंगेखोरांना वेळीच आवार घातला पाहिजे. खरं तर हे केंद्र सरकारचं अपयश आहे. त्यासाठी मी केंद्र सरकारचा निषेध करतो. तसेच भाजपाशी त्यांचे संबंध जोडल्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. जर तुम्हाला दंगेखोरांवर नियंत्रण मिळवता येत नसेल तर सत्तेतून पायउतार व्हा, असं रजनीकांत यांनी थेट आव्हानच दिलं आहे. परंतु त्यांनी कोणाच्याही नावाचा उल्लेख केलेला नाही. यात कुठे ना कुठे सरकारचंही अपयश आहे, असंही त्यांनी अधोरेखित केलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या दौऱ्याचा हवाला देत रजनीकांत म्हणाले, जेव्हा ट्रम्प भारताच्या दौऱ्यावर आले होते, तेव्हा केंद्रानं सावधानता बाळगण्याची गरज होती. आयबीनं आपलं काम नीट केलं नाही. हिंसा पसरवण्यांविरोधात कडक कारवाई केली पाहिजे होती. आता तरी आम्ही अपेक्षा करतो की तुम्ही सावधान व्हाल, असं म्हणत मोदी सरकारवर निशाणा साधला. विरोध प्रदर्शन करणाऱ्यांनी हिंसक होण्याची आवश्यकता नाही. जर सीएएनं खरंच मुस्लिमांचं नुकसान होणार असल्यास मी त्यांच्यासोबत असल्याचाही त्यांनी पुनरुच्चार केला आहे.
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत एक ट्विट केलं आहे. पंतप्रधान मोदींनी ट्विट करून दिल्लीकरांना शांतता आणि एकता राखण्याचे आवाहन केले आहे. बुधवारी (26 फेब्रुवारी) मोदींनी आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून एक ट्विट केलं आहे. यामध्ये त्यांनी दिल्लीतील परिस्थितीचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे. तसेच पोलीस आणि अन्य यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न करत असल्याचं म्हटलं आहे. 'शांतता आणि सुसंवाद राखणे ही आपली जबाबदारी आहे. मी दिल्लीच्या माझ्या भावांना आणि बहिणींना आवाहन करतो की, त्यांनी कायम शांतता आणि बंधुता जपावी. दिल्ली शहर शांत राहावं आणि लवकरात लवकर पूर्वपदावर यावं हे जास्त महत्त्वाचं आहे' असं ट्विट नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Delhi Violence : हिंसाचार रोखण्यासाठी सरकार कठोर पावले उचलण्याच्या तयारीत, आगडोंबात 20 जणांचा मृत्यू
Delhi Violence:...म्हणून मी त्या दंगलखोराला समोरा गेलो, पोलिसाने सांगितले कारण
Delhi Violence:...त्या एका गोष्टीमुळे वादाची ठिणगी पडली, हिंसाचाराच्या आगडोंबाने दिल्ली पेटली
Delhi Violence: 'दंगलग्रस्त भागात तैनात असलेले हे लष्करी पोशाखातले लोक कोण?'