नवी दिल्ली : ईशान्य दिल्लीतील हिंसाचाराची आग शमली असली तरी स्थानिक तसेच भाडेतत्त्वावर राहणाऱ्या रहिवाशांमध्ये अद्याप भीतीचे वातावरण आहे. मागील तीन दिवसांत चांदबाग, मुंगानगर, करावलनगर, घोंडा व गोकुलपुरीमध्ये घडलेल्या हिंसाचारापासून अनेक लोकांनी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे. यामध्ये प्रामुख्याने कामासाठी, व्यवसायासाठी या भागात रहिवासी असलेल्या लोकांचा समावेश अधिक आहे.अनेकजण आपल्या कुंटुबियांना खासकरून ज्येष्ठ महिला व मुलांना पाहुण्यांकडे, तसेच आपल्या मूळगावी परत पाठवत आहेत. दुसºया राज्यातून नोकरीसाठी आलेल्या लोकांनीशहरातील दुसºया परिसरात घराचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे.आता वातावरण शांत झाले असले तरी अचानक कधीही जमाव एकत्र येऊ शकतो. गोळीबार, घोषणाबाजी सुरू होऊ शकते. घरातील लहान मुले घाबरून सतत काय चाललेय, हे विचारायची. त्यामुळे मुले व पत्नीला लखनऊ येथील नातेवाईकांकडे पाठवून दिले, अशी माहिती चांदनगर येथील रहिवासी आरीफ यांनी दिली आहे.घरे रिकामी करण्यास सुरुवातघोंडा परिसरात जे लोक भाडेतत्त्वावर राहत होते, त्यांनीही घरे रिकामी करण्यास सुरुवात केली आहे. वेगवेगळ्या फॅक्टरीमध्ये काम करणारे कामगारही आपल्या गावी जात असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आहे.मौजपूर परिसरातील अनेक दुकाने आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. त्यामुळे तिथे काम करणाºया कामगारांना आपल्या गावी परत जाण्याशिवाय पर्याय नसल्याची माहिती रफि क मोहम्मद यांनी दिली आहे.कुटुंबातील सदस्यांना सुरक्षित ठिकाणी पाठवल्यानंतर किमान पुरुषांना निर्धास्तपणे कामाचा शोधही घेता येईल, असेही मत अनेकांनी व्यक्त केले.
Delhi Violence: कामगार, भाडेकरूंनी कुटुंबे पाठविली गावी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2020 2:32 AM