ऑनलाइन लोकमत -
नवी दिल्ली, दि. 12 - संसद परिसरात तरुणाने झाडाला गळफास लावून आत्महत्या केली आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे संसद परिसरात इतकी कडक सुरक्षाव्यवस्था असतानाही या तरुणाने आत्महत्या कशी केली ? यावरुन प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत. सकाळी 7 वाजता या तरुणाचा मृतदेह झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळला.
पोलिसांनी या तरुणाची ओळख पटवली असून राम दयाल वर्मा असं त्याचं नाव आहे. राम दयाल वर्मा मध्यप्रदेशच्या शिवपूरचा रहिवसी आहे. पोलिसांना 23 पानांची सुसाईड नोटही सापडली आहे. क्रिकेटवर लावलेल्या सट्ट्यात झालेल्या नुकसानामुळे ही आत्महत्या केली असल्याचा अंदाज सुसाईट नोटच्या आधारे पोलिसांनी वर्तवला आहे. पोलिसांना मृतदेहाजवळ एक बॅगही सापडली आहे.
राम दयाल वर्मा विवाहित असून त्याला चार मुले आहेत. बुधावारी तो दिल्लीत आला होता. विजय चौक परिसरात सरकारी इमारती असल्याने येथे मोठ्या प्रमाणात सुरक्षाव्यवस्था असते. इतकी सुरक्षा असतानादेखील आत्महत्या करत असताना कोणी रोखलं कसं नाही ? हा प्रश्न उपस्थित होत आहे.