शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेला अन् त्याचा मृतदेहच मायदेशी परतला! 

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2019 12:30 PM

बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.

नवी दिल्ली - बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेलेल्या एका 28 वर्षीय तरुणाचा रहस्यमयरीत्या मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. सौरभ शर्मा असे या तरुणाचे नाव असून, तो दिल्लीमधील न्यू अशोकनगर परिसरात राहणारा आहे. सौरभ हा त्याच्या मित्रांसोबर बॅचलर्स पार्टीसाठी थायलंडला गेला होता. तेथे त्याचा मृतदेह संशयास्पद परिस्थितीत स्वीमिंग पूलमध्ये सापडला. पेशाने इंजिनियर असलेल्या सौरभ याचा विवाह 21 नोव्हेंबर रोजी होणार होता. त्यामुळे त्याच्या बॅचलर्स पार्टीचे आयोजन करण्यात आले होते. सौरभला प्रवासाची आवड होती. त्यामुळे यावेळी त्याने मित्रांसह थायलंडला जाण्याचा प्लान आखला होता. थायलंडमधील ज्या हॉटेलचे बुकींग केले होते तिथे पोहोचल्यानंतर भोजन करून तो पोहण्यासाठी गेला. मात्र स्वीमिंग पूलमध्ये असतानाच अचानक त्याची तब्येत बिघडली. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिथे त्याला व्हेंटीलेटरवर ठेवण्यात आले होते. दरम्यान, 36 तासांनंतर त्याचा मृत्यू झाला.  दरम्यान,  सौरभचे वडील महिपाल शर्मा यांनी जेव्हा हॉटेलकडे सीसीटीव्ही फुटेज मागितले तेव्हा हॉटेल व्यवस्थापनाने सीसीटीव्ही फुटेज दाखवण्यास नकार दिला. दरम्यान, पोलिसांकडे तक्रार केल्यानंतरही काही सकारात्मक उत्तर मिळाले नाही. त्यामुळे सौरभची हत्या झाली असावी, असा संशय त्याच्या कुटुंबीयांनी व्यक्त केला. सौरभचे वडील म्हणाले की, 'पोलिसांनी सांगितले की सौरभचा मृत्यू रुग्णालयात जाताना झाला. जर असं असेल तर त्याला उपचारांसाठी रुग्णालयात का ठेवले. सौरभचा जर रुग्णालयात जाताना मृत्यू झाला तर मग उपचारांसाठी पैसे का द्यावे लागलेत. सौरभवरील उपचारांसाठी आम्ही रुग्णालयाला 18 लाख रुपये दिले, असे जेव्हा आम्ही पोलिसांना सांगितले. तेव्हा त्यांनी आपला जबाब बदलून सौरभचा रुग्णालयात उपचारांदरम्यान मृत्यू झाला, असा उल्लेख केला.'दरम्यान, सौरभच्या वडिलांनी गृहमंत्रालयाला पत्र पाठवून न्याय देण्याची मागणी केली आहे. तसेच आपल्या मुलाच्या मृत्यूची योग्य ती चौकशी व्हावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.  

टॅग्स :New Delhiनवी दिल्लीCrime Newsगुन्हेगारीThailandथायलंड