सुरेश भटेवरा, नवी दिल्लीदिल्लीत सोमवारीही धुकेमिश्रित प्रदूषणाचा स्तर काही भागात ११ पट अधिक होता. हरयाणा, पंजाब, राजस्थान, उत्तर प्रदेश या दिल्ली शेजारील चार राज्यांच्या पर्यावरणमंत्र्यांच्या बैठकीनंतर, केंद्रीय पर्यावरणमंत्री अनिल माधव दवे म्हणाले, या गंभीर समस्येसाठी परस्परांवर दोषारोप करून चालणार नाही. दिल्लीला प्रदूषणाच्या समस्येतून मुक्त करण्यासाठी वर्षाचे ३६५ दिवस सक्रिय राहावे लागेल.दिल्लीत ८0 टक्के प्रदूषण हे स्वत: दिल्लीनेच निर्माण केले आहे. शेजारी राज्यांच्या सहभाग त्यात फक्त २0 टक्के आहे, असे नमूद करीत पर्यावरणमंत्री दवे म्हणाले, बऱ्याच आधी याची पूर्वकल्पना पर्यावरण मंत्रालयाने राज्य सरकारला दिली होती. मात्र त्याकडे दुर्लक्ष करण्यात आले. प्रदूषणमुक्तीसाठी केंद्रातर्फे गतवर्षी ४२ कलमी अजेंडाही जारी करण्यात आला. यंदा पुन्हा एकदा कसोशीने त्याचा पाठपुरावा केला जाईल. पर्यावरण मंत्रालयातर्फे हवामान स्थिती व त्यासाठी करावयाच्या उपाययोजना याचे वर्षभराचे कॅलेंडरच जारी करण्यात येणार आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी खरं तर दिल्लीत भरपूर पाऊस पडण्याची आवश्यकता आहे तथापिया आठवड्यात ती शक्यता कमी आहे. वाऱ्यांचा वेग वाढणे हाच तूर्त एकमात्र आहे. वाऱ्यांचा वेग ताशी १0 कि.मी.पर्यंत हवेची गती वाढत नाही, दिल्लीच्या वातावरणातले धुके व प्रदूषणाचा स्तर पुरेसा कमी होणार नाही.
दिल्लीकरांची तूर्त तरी प्रदूषणातून सुटका नाही
By admin | Published: November 08, 2016 3:19 AM