सरकारी निष्क्रियता आणि पंजाबमध्ये शेतात जाळण्यात येणारे काडीकस्पट (शेतातील पिकांचे अवशेष) दिल्लीकरांच्या मुळावर आले आहेत. दोन कोटी दिल्लीकरांच्या आयुष्यातील तीन वर्षे या प्रदूषणाने कमी झाली आहेत. हा अपराध हत्येच्या समान आहे. यासाठी या सरकारी यंत्रणा जबाबदार आहेत, अशा शब्दांत दिल्ली उच्च न्यायालयाने गुरुवारी या यंत्रणांना फटकारले आहे.या गंभीर परिस्थितीने सहा कोटींपेक्षा अधिक आयुष्ये उद्ध्वस्त होत आहेत. किंबहुना यामुळे दहा लाख मृत्यू होत आहेत. असेही न्यायालयाने सुनावले. दिल्लीत दोन कोटींपेक्षा जास्त लोकसंख्या आहे. ही हानी दहा लाख मृत्यूंच्या बरोबरीची आहे. ही हत्या नाही तर काय आहे? या प्रदूषणाला सरकारी निष्क्रियता कारणीभूत आहे.व्होट बँक जास्त महत्त्वाची आहे की नागरिक? असा प्रश्नही न्यायालयाने केला.
दिल्लीतील प्रदूषणामुळे आयुष्य होतेय कमी
By admin | Published: November 11, 2016 4:31 AM