शहरं
Join us  
Trending Stories
1
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
2
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
3
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींची हवा संपली, रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”
4
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
5
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
6
शेअर बाजारातील घसणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल 
7
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
8
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
9
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
10
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
11
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
12
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
13
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
14
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
15
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
16
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
17
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
18
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
19
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब

आल्हाददायक : देशात यंदा पाऊस वेळेवर आणि भरपूर!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 16, 2020 6:11 AM

कोरोनामुळे हवालदिल झालेल्या देशवासीयांसाठी हवामान खात्याची शुभवार्ता

नवी दिल्ली : कोरोनाच्या भीषण संकटाने देश हवालदिल झालेला असतानाच यंदा नैऋत्य मोसमी पाऊस भारतात ठरल्यावेळी येईल आणि भरपूर कोसळेल, अशी शुभवार्ता हवामान खात्याने बुधवारी दिली. यामुळे समस्त देशवासीय विशेषत: शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.साधारणपणे ७ जूनला पावसाला सुरुवात होणाºया महाराष्ट्रात मात्र केरळहून निघालेला पाऊस पोहोचायला तीन ते सात दिवसांचा उशीर होऊ शकेल, असेही म्हटले आहे. हवामान खाते पावसाचे दीर्घकालीन अंदाज एप्रिल व जून असे दोन वेळा वर्तविते. ‘लॉकडाउन’मुळे प्रत्यक्ष पत्रकार परिषद न घेता भूविज्ञान खात्याचे सचिव डॉ. एम. राजीवन व हवामान खात्याचे महासंचालक डॉ. एम. मोहपात्रा यांनी आॅनलाइन ब्रीफिंग घेत यंदाचे पहिले भाकीत जाहीर केले. यंदा नैर्ऋत्य मोसमी पाऊस ठरल्या वेळी म्हणजे येत्या १ जून रोजी भारतीय उपखंडाच्या अगदी दक्षिणेकडे केरळ किनाºयावर दाखल होईल व त्यानंतर सप्टेंबरपर्यंतच्या चार महिन्यांत देशभर दीर्घकालीन सरासरीच्या १०० टक्के म्हणजे भरपूर पाऊस पडेल, असा अंदाज त्यांनी जाहीर केला.३ ते ७ दिवसांचा विलंबकेरळमध्ये वेळेवर आला तरी देशांतर्गत भागात तो थबकत थबकत विलंबाने पसरतो असा अनुभव आहे. त्यानुसार महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगढ, तेलंगण, आंध्र प्रदेश, ओदिशा, झारखंड, बिहार व उत्तर प्रदेशच्या काही भागांत पावसाच्या आगमनाला तीन ते सात दिवसांचा विलंब होऊ शकेल. राजस्थानच्या काही भागात मात्र तो अपेक्षित तारखेहून आठवडाभर लवकर म्हणजे ८ जूनपर्यंतच पोहोचेल.असा येईलपाऊसपुणे १० जूनमुंबई ११ जूनअहमदनगर १२ जूनसातारा १२ जूनकोल्हापूर १२ जूनजळगाव १३ जूननागपूर १५ जून

टॅग्स :Rainपाऊसcorona virusकोरोना वायरस बातम्याMonsoon Specialमानसून स्पेशल