शहरं
Join us  
Trending Stories
1
मविआत अजून गोंधळात गोंधळ, २३ मतदारसंघांत उमेदवारच नाही; अर्ज भरायला दोनच दिवस शिल्लक
2
आजचे राशीभविष्य, २८ ऑक्टोबर २०२४: नशीबाची साथ मिळेल, मित्रांशी भेटी होतील, प्रवास घडेल.
3
वरळीत मिलिंद देवरा वि. आदित्य ठाकरे लढत; शिंदेसेनेची दुसरी यादी जाहीर
4
दिवाळी सप्ताह: ४ राशींना सर्वोत्तम वरदान, लाभच लाभ; पद-पैसा वाढ, लक्ष्मी-कुबेर शुभच करतील!
5
काँग्रेसने औरंगाबाद पूर्व, अंधेरी पश्चिमचे उमेदवार बदलले; विधानसभेसाठी चौथी यादी जाहीर
6
कर्जाच्या तणावातून आईची हत्या; आत्महत्येचा प्रयत्न, वरळीतील घटना
7
​​​​​​​देशातील शहरे झाली गॅस चेंबर, ११ शहरांतील हवा धोकादायक
8
नेतान्याहू, थोडी लाज वाटू द्या! हमास हल्ल्यातील बळींच्या स्मरणार्थ कार्यक्रमात आंदोलकांच्या घोषणा
9
रेल्वेत जागा पकडण्यासाठी उडाली झुंबड, मुंबईत चेंगराचेंगरी; १० जखमी, दोन गंभीर
10
अजित पवार गटाकडून आणखी चार उमेदवार जाहीर; गेवराईतून विजयसिंह पंडित, तर पारनेरमधून दाते 
11
दिवाळीला नोटांची तोरणे.. प्रत्येक पक्षासाठी अस्तित्वाची लढाई!
12
चर्चेचे गुऱ्हाळ, नेत्यांचा अहंपणा आघाडीच्या मुळावर!
13
विमानात बॉम्ब ठेवला असल्याच्या खोट्या धमक्या कुठून येतात?
14
३२ जागांवर राष्ट्रवादी वि. राष्ट्रवादी; शरद पवार गटाची तिसरी यादी जाहीर
15
मन ही मन लड्डू फुटे, हाथों मे फुलझडियां!
16
मनसे ​​​​​​​उमेदवारांची सहावी यादी जाहीर, आतापर्यंत ११० जण रिंगणात
17
वसंत देशमुख यांना पुण्यातून घेतले ताब्यात, जयश्री थोरातांसह ५० जणांविरुद्ध गुन्हा
18
सेमीकंडक्टर उद्योग राखेल समतोल; जगातील सत्तांना उद्देशून परराष्ट्रमंत्री जयशंकर यांचे प्रतिपादन
19
ॲडव्हान्स व्होटिंग आणि ८.५ कोटींचं आमिष!
20
'26/11 मुंबई हल्ल्यानंतर भारताने प्रत्युत्तर दिले नव्हते, पण आता...', एस जयशंकर स्पष्ट बोलले

COVID-19: जिभेला सूज, तोंडात फोड येणे अन् दातदुखी; कोरोनाच्या 'या' नव्या लक्षणांकडे अजिबात दुर्लक्ष नको!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 30, 2022 8:06 PM

कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत.

नवी दिल्ली- 

कोरोना महामारीला जवळपास तीन वर्षे झाली आहेत. या काळात आपल्याला या विषाणूबद्दल बरीच माहिती मिळाली आहे. पण अजूनही कोरोना विषाणूचे नवनवे व्हेरिअंट जसे समोर येत आहेत तशी कोरोनाची लक्षणं देखील बदलत आहेत. ताप, खोकला, थकवा, चव आणि वास जाणे ही तर कोरोनाची प्राथमिक लक्षणं तर आहेतच पण त्यात आता आणखी वेगवेगळ्या लक्षणांची वाढ होत आहे. लसीकरण जरी वेगानं होत असलं तरी विषाणूचे नवे व्हेरिअंट आढळून येत असल्यानं संसर्गाचा धोका अजूनही कायम आहे. नुकत्याच एका रिसर्चमध्ये असं दिसून आलं आहे की कोरोना विषाणूची इतरही काही लक्षणं आहेत. जी नव्यानं समोर आली आहेत. यातील काही लक्षणं अगदीच असामान्य आहेत. यामध्ये तोंड, दात आणि जीभ यांचा समावेश होतो. 

कोरोना विषाणूचा दातांच्या आरोग्यावर कसा परिणाम होतो?कोरोना व्हायरस ACE2 नावाच्या रिसेप्टर्सद्वारे आपल्या रक्तामध्ये प्रवेश करतो आणि हे रिसेप्टर्स आपल्या तोंड, जीभ आणि हिरड्यांमध्ये देखील असतात. त्यामुळे, ज्या लोकांची 'ओरल हेल्थ' खराब आहे त्यांच्याकडे ACE2 रिसेप्टर्स जास्त असतात. संशोधनात असंही दिसून आले आहे की दातांच्या खराब समस्या असलेले लोक देखील गंभीर COVID-19 संसर्गास बळी पडू शकतात.

जिभेवर कोरोना व्हायरसची लक्षणे कोणती?कोरोना विषाणूचा तोंडाच्या आरोग्यावरही परिणाम होतो. याची लागण झालेल्या अनेक रुग्णांना तोंडात फोड येणे, जिभेवर सूज येणे, तसंच काहींनी तोंडात व्रण येण्याच्या तक्रारीही केल्या आहेत. अशा लक्षणांमुळे जेवण करताना अस्वस्थता येते. तज्ज्ञांच्या मतानुसार कोरोनामुळे जीभही प्रभावित होऊ शकते. यामध्ये रुग्णाला जिभेच्या पृष्ठभागावर जळजळ आणि सूज जाणवू शकते. हे प्रतिजैविकांच्या जास्त भारामुळे देखील होऊ शकतं. 

या लक्षणांबद्दल कमी का बोललं जातं?या लक्षणांची मुख्यतः दोन कारणांसाठी कमी चर्चा केली जाते. पहिलं कारण म्हणजे ही लक्षणे असामान्य आहेत, म्हणजेच ती सर्व रुग्णांमध्ये नोंदवली जात नाहीत. ही लक्षणं कमी रुग्णांमध्ये आढळतात, त्यामुळे त्यांच्याबाबत जास्त चर्चा होत नाही. दुसरं कारण म्हणजे ही लक्षणं विषाणूच्या इतर लक्षणांपेक्षा कमी गंभीर स्वरुपाची आहेत.

दरम्यान, जागतिक आरोग्य संघटनेनं (WHO) दिलेल्या इशाऱ्यानुसार ओमायक्रॉनची लक्षणं जसे की सौम्य सर्दी आणि फ्लू याकडे दुर्लक्ष करू नये. नवा व्हेरिअंट डेल्टा पेक्षा कमी गंभीर असू शकतो, परंतु तरीही हा एक सौम्य रोग नाही, असाही सावधानतेचा इशारा डब्ल्यूएचओनं दिला आहे. 

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाCorona vaccineकोरोनाची लस