जागतिक आरोग्य संघटनेसाठी (World Heath Organization) कोविडचा डेल्टा प्लस व्हेरिअंट (Covid 19 Delta+ Variant) हा सध्या चिंतेचा विषय नसल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य वैज्ञानिक डॉ. सौम्या स्वामीनाथन (Dr Soumya Swaminathan) यांनी गुरूवारी दिली. "या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या खुप कमी आहे. कोविशिल्ड या लसीला आपल्या वॅक्सिन पासपोर्ट कार्यक्रमापासून रोखणाऱ्या देशांकडे कोणताही तर्क नव्हता, जे महासाथीदरम्यान कोणत्याही समस्येशिवाय प्रवासाची परवानगी देतं,"असंही त्याल म्हणाल्या.
"हे अधिककरून तातंक्रिक पद्धतीवर करण्यात आलं आहे. कारण अॅस्ट्राझेनका वॅक्सिन युरोपमध्ये एका निराळ्या ब्रँड अंतर्गत उपलब्ध आहे. जागतिक आरोग्य संघटना वॅक्सिन पासपोर्टमध्ये कोविशिल्डचा समावेश करण्यासाठी युरोपियन वैद्यकीय नियामकाशी चर्चा करत आहे. ऑगस्ट महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यात यावर निर्णय होण्याची शक्यता आहे," असंही स्वामीनाथन म्हणाल्या. एनडीटीव्हीशी साधलेल्या विशेष संवादादरम्यान त्यांनी यावर भाष्य केलं.
लसीचा प्रभाव कमी नाही - पॉल"सध्या डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे(Delta Plus Variant) लसीचा प्रभाव कमी होत असल्याचा कोणताही आकडा आमच्याकडे नाही. नियमांचे पालन आणि कोविड महामारीपासून वाचण्यासाठी प्रभावी पाऊल देशाला कोणत्याही मोठ्या संकटातून वाचण्यासाठी फायदेशीर ठरणार आहे. डेल्टा प्लस व्हेरिएंटबाबत वैज्ञानिक आधार नाही ज्याने हा व्हायरस वेगाने संसर्ग पसरवत आहे हे सिद्ध होईल किंवा कोविड लसीचा प्रभाव कमी करत आहे. महामारीची नवी लाट अनेक गोष्टींवर निर्भर असते," असं मत भारतातील कोविड टास्क फोर्सचे प्रमुख व्ही. के पॉल यांनी सांगितलं.
सध्याच्या महामारीत कोरोना संसर्गापासून बचाव करण्याची योग्य पद्धत ही नियमांचे कटोर पालन आणि लसीकरण धोरणांच्या दृष्टीकोनात व्यापक अनुशासनांवर अवलंबून असेल. याव्यतिरिक्त, विषाणूमध्ये होणारे बदल कोरोना आजाराची गतिशीलता बदलू शकते. महासाथीची आणखी एक लाट येईल की नाही, हे आमच्या नियंत्रणाखाली नाही. माझ्या मते, लाटेसाठी कोणतीही तारीख दिली जाऊ शकत नसल्याचंही ते म्हणाले.