शहरं
Join us  
Trending Stories
1
Vinod Tawde: हे गँगवॉर असू शकते...; विनोद तावडे प्रकरणात उद्धव ठाकरेंनी व्यक्त केला संशय
2
“५ कोटी कोणाच्या सेफमधून बाहेर आले?”; विनोद तावडे प्रकरणी राहुल गांधींचा PM मोदींना सवाल
3
विनोद तावडेंवर पैसे वाटपाचा आरोप; बविआचा राडा, निवडणूक आयोगाची पहिली प्रतिक्रिया काय?
4
राज्यातील 'हे' ३१ उमेदवार स्वतःला मत देऊ शकणार नाहीत! नक्की काय आहे प्रकरण?... वाचा
5
Amol Kolhe : "पैशाच्या जोरावर महाराष्ट्र जिंकायचा, गुजरातच्या दावणीला बांधायचा"; अमोल कोल्हेंचा भाजपावर हल्लाबोल
6
'पैशासाठी दिल्ली कॅपिटल्सचा संघ सोडलेला नाही...', IPL 2025 लिलावापूर्वी Rishabh Pant च्या पोस्टने खळबळ
7
मतदान एका दिवसावर! महायुती की मविआ?... हे मुद्दे विचारात घेऊन मतदार मत देणार…
8
Vinod Tawde : भाजप नेते विनोद तावडे यांच्यावर निवडणूक आयोगाची कारवाई, पैसे वाटल्याच्या आरोपावरून FIR दाखल
9
मणिपूरमध्ये वाद वाढला, एनडीएचा प्रस्ताव मैतेई संघटनेने फेटाळला; २४ तासांचा अल्टिमेटम दिला
10
“भाजप अन् विनोद तावडेंवर निवडणूक आयोगाने कठोर कारवाई करावी”: बाळासाहेब थोरात
11
Video - डान्स करतानाच नवरदेवाला आला हार्टअटॅक; वराती ऐवजी निघाली अंत्ययात्रा
12
विनोद तावडेंच्या डायरीत १५ कोटी रुपयांची नोंद; क्षितीज ठाकूर यांचा खळबळजनक आरोप
13
संपूर्ण महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला सरकारी सुट्टी; शेअर बाजार-बँका बंद, पण...
14
शेत, प्लॉट मोजणीचे शुल्क किती, माहितेय का?
15
...अन् शेवटी तावडे आणि ठाकूर एकाच गाडीत बसून गेले; चार तासांत नेमकं काय-काय घडलं?
16
एवढा पैसा आला कुठून? विनोद तावडेंच्या आरोपावरून सुप्रिया सुळेंचा सवाल
17
‘एक है तो सेफ है’ घोषणेवरून लालूप्रसाद यादवांची भाजपासह साधूसंतांवर टीका, म्हणाले...  
18
Vinod Tawde: विनोद तावडे प्रकरणात ९,९३,५०० रुपये रक्कम सापडली; निवडणूक आयोगाची माहिती
19
IPL 2025: मेगा लिलावाआधी १९ वर्षीय मराठमोळ्या खेळाडूची रंगली चर्चा, कोण आहे तो?
20
“गृहखात्याने पाळत ठेवली अन् विनोद तावडे जाळ्यात अडकतील याचा बंदोबस्त केला”; राऊतांचा दावा

उत्तम समन्वयासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2019 1:54 AM

घटक पक्षांत चिंतेचे वातावरण; मतभेदांचे निवारण करण्याचा हेतू

नवी दिल्ली : मतभेदांचे निवारण करण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समिती स्थापना करावी, अशी मागणी या आघाडीतील घटक पक्षांनी केली आहे. भाजपशी झालेल्या तीव्र मतभेदांनंतर शिवसेना एनडीएमधून बाहेर पडली. त्या वादंगाचे सावट एनडीएच्या रविवारी झालेल्या बैठकीवर पडले होते.या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, एनडीएमधील घटक पक्ष भलेही वेगवेगळ््या विचारसरणींचे असतील पण आपण एखाद्या मोठ्या कुटुंबासारखे आहोत. लहानसहान गोष्टींवरून आपापसात मतभेद होणे योग्य नाही.या बैठकीनंतर मोदींनी एका टिष्ट्वटमध्ये म्हटले आहे की, भारतातील विविधतेचे दर्शन एनडीएमध्ये घडते. देशातील शेतकरी, युवक, महिला, गरीबातील गरीब मनुष्य यांच्या कल्याणासाठी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करू. संसदेचे हिवाळी अधिवेशन उद्या, सोमवारपासून सुरू होत असून त्या पार्श्वभूमीवर एनडीएची बैठक झाली.लोक जनशक्ती पार्टीचे नवनिर्वाचित अध्यक्ष चिराग पासवान यांनी म्हटले आहे की, एनडीएमधील सर्वात जुन्या घटक पक्षांपैकी एक असलेल्या शिवसेनेची अनुपस्थिती मला विशेषत्वाने जाणवली. सर्वात आधी तेलुगू देसमने एनडीएला रामराम केला. त्यानंतर राष्ट्रीय लोक समता पार्टीनेही तोच मार्ग पत्करला.या सर्व गोष्टींची मला चिंता वाटते. एनडीएमधील घटक पक्षांमध्ये उत्तम समन्वय असता तर महाराष्ट्रात भाजप व शिवसेनेमधील वादंग टाळता आले असते. यापुढे असे प्रसंग टाळण्यासाठी एनडीएमध्ये निमंत्रक नेमावा किंवा समन्वय समितीची स्थापना करावी असेही पासवान म्हणाले. अशीच मागणी लोक जनशक्ती पार्टीप्रमाणेच अपना दल, जनता दल (यू) व ईशान्य भारतातील काही घटक पक्षांनीही एनडीएच्या बैठकीत केल्याचे सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीShiv SenaशिवसेनाBJPभाजपा