ठाणे : रामास्वामी पेरियार आणि भारतीय संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे वैचारिक दहशतवादाचे जनक असल्याचा आरोप योगगुरू रामदेवबाबा यांनी एका वृत्तवाहिनीस दिलेल्या मुलाखतीमध्ये केला. त्यांच्या या विधानाचा निषेध करून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी मराठा सेवा संघाने कोपरी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र आगरकर यांना निवेदनाद्वारे केली आहे.मराठा सेवा संघाचे ठाणे जिल्हाध्यक्ष मंगेश आवळे यांनी आगरकर यांची भेट घेऊन त्यांना दिलेल्या निवेदनामध्ये रामदेवबाबांचा निषेध केला आणि त्यांच्यावर अॅट्रॉसिटी अॅक्टखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. रामदेवबाबांचे वक्तव्य अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायदा (अॅट्रॉसिटी अॅक्ट) अन्वये गुन्हा ठरत आहे. रामदेवबाबा यांनी त्यांचे वक्तव्य हे ठरावीक जातीला उद्देशून केले आहे. यामुळे त्यांच्यावर अॅट्रोसिटी अॅक्टअन्वये गुन्हा दाखल करण्याची मागणी आवळे यांच्यासह मराठा सेवा संघाचे पदाधिकारी संतोष मोरे, सुधीर भोसले व लवेश भुतेकर आदींनी केली आहे.
रामदेवबाबांवर अॅट्रॉसिटी दाखल करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 25, 2019 3:59 AM