नवी दिल्ली : कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (ईपीएफओ)च्या अंतर्गत असलेल्या कर्मचाऱ्यांना व पेन्शनरांना दरमहा ७५00 रुपये निवृत्ती वेतन मिळावे, यासाठी राष्ट्रीय संघर्ष समितीने डिसेंबरमध्ये दिल्लीत रस्ता रोको करण्याचे ठरविले असून, मागणी मान्य न झाल्यास देशव्यापी आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.या संघटनेचे अध्यक्ष अशोक राऊत यांनी सांगितले की, ईपीएसच्या पेन्शनसाठी नियमित रक्कम भरूनही कर्मचाऱ्यांना निवृत्तीनंतर अडीच हजारांपर्यंतच निवृत्ती वेतन दिले जाते. ही रक्कम अतिशय तुटपुंजी आहे आणि एवढ्याशा रकमेत घर चालवणे तर सोडाच, पण एकट्याचा मासिक खर्चही भागविणे अशक्य आहे. त्यामुळे ही रक्कम दरमहा किमान ७५00 रुपये करावी, अशी आमची मागणी आहे.ते म्हणाले की, ईपीएस-९५ खालील निवृत्त कर्मचाºयांना दरमहा ७५00 रुपये व या योजनेत अंतर्भूत नसलेल्या सेवानिवृत्तांना दरमहा ५000 रुपये दिले जावेत, अशी मागणी आम्ही करीत आहोत. महागाईनुसार त्यात वाढ केली जावी. त्यामुळेच त्यात महागाई भत्त्याचा समावेश करावा, असा आमचा आग्रह आहे.स्थानिक पातळीवरून सुरुवातया मागणीसाठी आधी स्थानिक पातळीवर ठिकठिकाणी आंदोलने केली जातील. त्यानंतर, दिल्लीत रस्ता रोको होईल आणि तरीही सरकारने आमच्या मागण्यांकडे लक्ष न दिल्यास सर्व सेवानिवृत्त लोक देशव्यापी आंदोलन करतील. तसा निर्णय संघटनेने घेतला आहे, असेही अशाक राऊ त यांनी सांगितले.
‘ईपीएफओ’च्या पेन्शनची रक्कम ७,५00 रुपये करण्याची मागणी
By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2019 2:03 AM