नवी दिल्ली : मजबूत देशांतर्गत मागणी अणि निर्यातीतील स्पर्धात्मक किमती याबळावरच भारतीय कंपन्या जागतिक तसेच देशांतर्गत धोरणांमुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेवर मात करू शकतात, असा निष्कर्ष एस अँड पी या जागतिक मानक संस्थेने जारी केला आहे.एस अँड पीने ‘इंडिया कॉर्पोरेट आऊटलूक २0१७’ या नावाचा एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात ही माहिती देण्यात आली आहे. संस्थेने म्हटले की, वेगवान आर्थिक वृद्धी आणि सुधारणा यांनी भारताला सूक्ष्म आर्थिक क्षेत्रात भक्कम स्थान मिळवून दिले आहे. याशिवाय कंपन्यांचा स्थिर के्रडिट फोईलही उपकारकच आहे. मजबूत आर्थिक वृद्धी आणि घसरणारे व्याजदर याबाबीही कंपन्यांना लाभदायक आहेत.एस अँड पीचे विश्लेषक अभिषेक डांगरा यांनी म्हटले की, जागतिक कंपन्यांच्या तुलनेत भारतीय कंपन्यांचे स्थान मजबूत आहे. भारतीय कंपन्यांची भांडवली खर्चाचे व्यवस्थापन आणि देशातील धोरणात्मक सुधारणा यांच्याशी जुळवून घेण्याची क्षमता चांगली आहे. या क्षमतेवर आम्हाला विश्वास आहे. डांगरा म्हणाले की, नोटाबंदीमुळे देशातील मागणीत मोठी घसरण झाली आहे. ही कंपन्यांच्या दृष्टीने चिंतेची बाब आहे. कंपन्यांसाठी चालू आर्थिक वर्षाच्या महसुली वृद्धीत ही मोठी जोखीम आहे. २0१८ मध्ये वस्तू व सेवा करामुळे अशीच जोखीम निर्माण होऊ शकते.
मागणी, निर्यातच कंपन्यांना वाचविणार
By admin | Published: January 19, 2017 4:49 AM