वकिलांच्या कार्यालयाला जागा देण्याची मागणी
By admin | Published: December 20, 2014 10:27 PM
अहमदनगर : जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात वकिलांना खासगी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहर बार असोसिएशनच्यावतीने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे़ याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे औरंगाबाद रोडवरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सुरू आहे़ नवीन इमारतीच्या आराखड्यात मात्र, वकिलांच्या खासगी कार्यालयासाठी काहीच तरतूद नाही. न्यायालयात येणार्या पक्षकारांबरोबर बार रुमध्ये चर्चा करणे शक्य होत नाही़ नवीन न्यायालयाच्या जागेलगत पश्चिमेस लागून असलेले व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामधील मोकळी जागा वकिलांच्या खासगी कार्यालयासाठी मिळावी़ ही जागा खासगी कार्यालयासाठी मिळावी, असा ठराव बार असोसिएशनने केला असून, शासकीय नियमाप्रमाणे होणारी कब्जेहक्काच
अहमदनगर : जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारत परिसरात वकिलांना खासगी कार्यालयासाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी शहर बार असोसिएशनच्यावतीने गृहराज्यमंत्री राम शिंदे यांच्याकडे करण्यात आली आहे़ याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, जिल्हा न्यायालयाच्या नूतन इमारतीचे औरंगाबाद रोडवरील जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयाजवळ सुरू आहे़ नवीन इमारतीच्या आराखड्यात मात्र, वकिलांच्या खासगी कार्यालयासाठी काहीच तरतूद नाही. न्यायालयात येणार्या पक्षकारांबरोबर बार रुमध्ये चर्चा करणे शक्य होत नाही़ नवीन न्यायालयाच्या जागेलगत पश्चिमेस लागून असलेले व जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या कार्यालयामधील मोकळी जागा वकिलांच्या खासगी कार्यालयासाठी मिळावी़ ही जागा खासगी कार्यालयासाठी मिळावी, असा ठराव बार असोसिएशनने केला असून, शासकीय नियमाप्रमाणे होणारी कब्जेहक्काची रक्कम शासनास देण्यास तयार असल्याचे या निवेदनात म्हटले आहे़ निवेदन देतेवेळी वकिल संघटनेचे अध्यक्ष ॲड़ मुकुंद पाटील, ॲड़ मंगेश सोले, ॲड़ गोरक्ष पालवे, ॲड़ गजेंद्र मिसाळ, ॲड़ अभय राजे, ॲड़ बी़एऩ राशिनकर आदी उपस्थित होते़ फोटो आहे़