शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई, राज्यातील ४० नेत्यांची पक्षातून हकालपट्टी
2
आजचे राशीभविष्य, ६ नोव्हेंबर २०२४ : कर्कसाठी आनंदाचा अन् कन्येसाठी काळजीचा दिवस
3
इस्रायलचा गाझामध्ये पुन्हा मोठा हल्ला! एअरस्ट्राइकमध्ये महिला-मुलांसह ३० जणांचा मृत्यू
4
सरकार 'या' कंपनीतील २.५ टक्के हिस्सा विकणार; ५०५ रुपये प्रति शेअर किंमत झाली निश्चित, जाणून घ्या
5
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Live Updates: मुंबईत आज इंडिया आघाडीची पहिली सभा; राहुल गांधी संबोधित करणार
6
नेमक्या कोणत्या कारणांमुळे रश्मी शुक्लांची झाली उचलबांगडी? समोर आली अशी माहिती
7
मुंबईत आव्वाज कुणाचा? उत्तर आणि उत्तर पश्चिम मुंबईत चुरशीच्या लढती, महायुती, मविआमुळे काही मतदारसंघांचे गणित बदलणार
8
भाजपाच्या विदर्भातील बालेकिल्ल्यातच प्रतिष्ठेची लढत, परिवर्तनाच्या लाटेवर काँग्रेसची भिस्त
9
सत्तेत आल्यास मुलांनाही मोफत शिक्षण, उद्धव ठाकरे यांचे आश्वासन, कोल्हापुरातून प्रचाराचा फोडला नारळ
10
'मिरज पॅटर्न' चौथ्यांदा चालेल? भाजपाच्या सुरेश खाडे यांच्यासमोर महाविकास आघाडीचे आव्हान, तानाजी सातपुते यांच्याशी लढत
11
"मविआ म्हणजे विकासाचे मारेकरी", मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा घणाघात
12
सर्वच खासगी मालमत्ता जप्तीचा सरकारला अधिकार नाही, सर्वोच्च न्यायालयाच्या नऊ न्यायाधीशांच्या खंडपीठाचा ७:२ बहुमताने निकाल
13
आता पोलिसांसह प्रत्येक सरकारी वाहनाचे चेकिंग, शरद पवारांच्या आरोपाची आयोगाकडून दखल
14
अमेरिकेच्या अध्यक्षीय निवडणुकीत कोणता मुद्दा यावेळी ठरणार निर्णायक?
15
पती-पत्नीला एकमेकांच्या हेरगिरीची परवानगी नाही, मद्रास व हिमाचल हायकोर्टाचे मत
16
'ऑलिम्पिक २०३६'च्या आयोजनास सज्ज, भारताने आयओसीकडे सोपविले आशय पत्र
17
'टीम इंडिया ऑस्ट्रेलियात ४-० ने जिंकणार नाही...', सुनील गावसकर यांचे धक्कादायक भाकीत
18
रणजी क्रिकेट: पृथ्वी शॉ याला मुंबईच्या संघात स्थान नाहीच, श्रेयसचं पुनरागमन
19
मुंब्र्यात छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर उभारा; फडणवीसांचं उद्धव ठाकरेंना आव्हान
20
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा

हिंदू महासभेने केली 'या' शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2018 8:24 PM

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद आणि फैझाबाद या शहरांचे नामांतर केल्यानंतर देशभरात नामांतराची लाट आली आहे.

मीरत - उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इलाहाबाद आणि फैझाबाद या शहरांचे नामांतर केल्यानंतर देशभरात नामांतराची लाट आली आहे. त्यावरून वाद-प्रतिवादही होत आहेत. दरम्यान, आता महात्मा गांधी यांची हत्या करणाऱ्या नथुराम गोडसेचे नाव मेरठ  शहराला देण्याची मागणी हिंदू महासभेने केली आहे. या मागणीमुळे राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. हिंदू महासभेने गुरुवारी नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांचा मृत्यूदिन साजरा केला. यावेळी नथुराम गोडसे हा महान पत्रकार आणि विचारवंत असल्याचा दावा हिंदू महासभेने केला. तसेच मेरठ शहराला नथुराम गोडसेचे नाव देण्याची मागणीही केली. तसेच गाझियाबादला दिग्विजयनगर आणि हापुडला महंत अवैद्यनाथ नाव देण्याची मागणी हिंदू महासभेकडून मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आली. तसेच इलाहाबादचे प्रयागराज असे नामांतर केल्याबद्दल योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन करण्यात आले आहे. योगी आदित्यनाथ यांनी  इलाहाबादचे प्रयाग असे नामांतर केल्यापासून देशात नामांतरावरून वाद-विवाद सुरू झाले आहेत. आता अहमदाबादचे नाव कर्णावती करण्यासाठी गुजरातमध्ये प्रयत्न सुरू झाले आहेत. तर महाराष्ट्रात औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशीव करण्याची मागणी करण्यात आली आहे. तर पुण्याचेही जिजापूर असे नामांतर करावे अशी मागणी संभाजी ब्रिगेडने केली आहे.  

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशPoliticsराजकारण