नवी दिल्ली : पाकिस्तानचे सैनिक दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद करून पाकिस्तानात परत गेले याचे पुरावे आहेत, असे भारताने म्हटले. दोन जवानांच्या शिरच्छेदानंतर संतप्त भारताने पाकिस्तानचे उच्चायुक्त अब्दुल बासित यांना बुधवारी पाचारण करून दोषींवर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी मागणी केली. परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी बासित यांना बोलावून घेतले होते. १ मे रोजी जम्मूत पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांना ठार मारून त्यांचा शिरच्छेद केला होता, असे परराष्ट्र मंत्रालयाने निवेदनात म्हटले. पाकिस्तानच्या बट्टल सेक्टरमधील (बट्टल खेड्याच्या परिसरात) ठाण्यांनी गोळीबार सुरू ठेवून मारेकऱ्यांना संरक्षण पुरवले होते हे महत्त्वाचे. भारतीय जवानांच्या रक्ताचे नमुने गोळा करण्यात आले असून, रक्ताचा माग रोझा नाल्यापर्यंत जातो. यावरून हे स्पष्ट आहे की, जवानांचे मारेकरी सीमारेषा ओलांडून आले होते, असे परराष्ट्र मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. नायब सुभेदार परमजित सिंग आणि सीमा सुरक्षा दलाचे हेड कॉन्स्टेबल प्रेम सागर यांना पाकिस्तानच्या बॉर्डर अॅक्शन टीमने पूंछ भागात २५० मीटर आत येऊन ठार मारले व त्यांचा शिरच्छेद केला. पाकिस्तानच्याच सैनिकांनी दोन भारतीय जवानांचा शिरच्छेद केला याचे पुरेसे पुरावे आहेत व पाकिस्तानने मारेकऱ्यांविरोधात कारवाई केली पाहिजे, असे भारताने बुधवारी म्हटले. शिरच्छेदाचा प्रकार हा पूर्णपणे चिथावणी देण्याचाच असल्याचे भारत मानतो, असे परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते गोपाल बागले म्हणाले. भारतीय जवानांच्या विटंबनेमध्ये पाकिस्तानी लष्कर सहभागी आहे, असे सरकारने ठामपणे म्हटले. पाकव्याप्त काश्मीरच्या भारताकडील भागातून मारेकरी आले आणि परत गेले.नेहमीप्रमाणे पाकिस्तानकडून इन्कारअब्दुल बासित यांनी पाकिस्तानी सैनिकांनी दोन जवानांच्या शरीराची विटंबना केल्याचा इन्कार केला, असे बागले यांनी सांगितले. भारताचे म्हणणे माझ्या सरकारला कळवीन, असे बासित यावेळी म्हणाल्याचे ते म्हणाले.
मारेकऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी
By admin | Published: May 04, 2017 1:27 AM