ऑनलाइन लोकमत
https://t.co/zXkpEddbws Has #BJP become #Beaf Joy Party? #Parrikar should resign immediately to wash the face of #BJP .— Dr.Surendra Jain (@drskj01) July 19, 2017
धर्म सोडा किंवा शिक्षा भोगा! चीनच्या कम्युनिस्ट पार्टीचा सदस्यांना इशारा
संसदेतील कॅन्टीनच्या जेवणात आढळला कोळी
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी गोवा विधानसभेत असं म्हटलं की, आम्ही बेळगावातून बीफ आयात करण्याचा पर्याय बंद केलेला नाही, जेणेकरुन राज्यात बीफची कमतरता भासू नये. भाजपाचे आमदार नीलेश काब्राल यांनी बीफसंदर्भात उपस्थित केलेल्या प्रश्नावर मनोहर पर्रीकर यांनी हे उत्तर दिलं. गोव्यात दिवसाला किती बीफची गरज भासते आणि ती कशी भागवली जाते, याची माहिती मागितली होती. गोव्याची गरज भागवताना गोवा मांस प्रकल्पातून 2 क्विंटल बीफ पुरवलं जाते. उर्वरित गरज ही कर्नाटकातून येणा-या मासांतून भागवली जाते, असे यावेळी मुख्यमंत्र्यानी सांगितलं. यावर पर्रीकर यांनी असंही सांगितलं की, मी तुम्हाला विश्वास देऊ शकतो की शेजारील राज्यातून येणा-या बीफची योग्य तपासणी अधिकृत व्यक्तींद्वारे केली जाईल. पर्रीकर असेही म्हणाले की, जवळपास 40 किलोमीटर दूरवर असलेल्या पोंडामधील गोवा मीट कॉम्प्लेक्समध्ये राज्यातील एकमेव अशा अधिकृत कत्तलखान्यात दररोज जवळपास 2,000 किलोग्रॅम बीफ तयार केले जाते.