नवी दिल्ली : काँग्रेसच्या नेतृत्वात आज राजधानी दिल्लीत संविधान बचाव कार्यक्रम पार पडला. यावेळी पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जु खरगे यांनी संभल मशीद प्रकरण आणि वक्फ बोर्ड प्रकरणासह विविध मुद्द्यांवरुन भाजपवर जोरदार टीका केली. 'हे लोक मशिदीखाली मंदिर असल्याचे सांगत आहेत. पण, मोहन भागवत 2022 मध्ये म्हणाले होते की, प्रत्येक मशिदीखाली शिवालय शोधण्याचा प्रयत्न करू नका. तुम्ही तुमच्या लोकांचे म्हणनेच ऐकत नाही.'
ताजमहाल-लाल किल्लाही पाडा'1947 पूर्वीच्या धार्मिक स्थळांची स्थिती कायम ठेवण्यासाठी 1991 मध्ये कायदा करण्यात आला होता, मात्र त्याचेही पालन होत नाही. त्यामुळे मोहन भागवतांचे विधान केवळ दिखाव्यासाठी आहे, असे मला वाटते. भाजपवाल्यांनी आता लाल किल्ला, कुतुबमिनार, ताजमहाल अन् हैदराबादचे चार मिनारही पाडा. हे सर्व मुस्लिमांनी बांधले आहे. मी स्वतः हिंदू आहे. माझे नाव मल्लिकार्जुन आहे. माझे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहे. पण, मी सेक्युलर हिंदू आहे. तुम्ही सेक्लुयर हिंदूंना मानत नाही. वक्फ विधेयकालाही आमचा विरोध आहे. कुठेतरी चूक झाली असेल तर ती सुधारता येते, पण तोडफोड देशाला विनाशाकडे घेऊन जाईल,' असेही खरगे यावेळी म्हणाले.
खरगेंची x पोस्टमल्लिकार्जु खरगेंनी आजच्या कार्यक्रमानंतर एक्स पोस्ट केली आहे. त्यात ते म्हणाले, 'आज ऐतिहासिक रामलीला मैदानावर संविधान वाचवण्यासाठी, आरक्षणाची मर्यादा वाढवण्यासाठी आणि जात जनगणनेसाठी काढण्यात आलेल्या रॅलीसाठी देशभरातून आलेल्या तुमच्या सर्व मित्रांचे मी अभिनंदन करतो. मी दलित, ओबीसी, अल्पसंख्याक आणि आदिवासी संघटनांच्या महासंघाचेही अभिनंदन करतो, ज्यांच्या झेंड्याखाली एक छोटासा भारत येथे एकत्र आला आहे. ही रॅली विविधतेतील एकतेचे प्रतीक आहे.'
'गेल्या 11 वर्षात भाजपने सातत्याने संविधान, घटनात्मक संस्था आणि लोकशाही कमकुवत करण्याचा प्रयत्न केला आहे. विरोधकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न झाला. माध्यमांवर बंधने आली, पत्रकारांना तुरुंगात टाकले. संविधान बदलण्यासाठी भाजप नेत्यांनी उघडपणे 400 जागांची मागणी करण्यास सुरुवात केली. अशा वातावरणात राहुल गांधींनी काश्मीर ते कन्याकुमारी आणि नंतर मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या यात्रांनी काँग्रेस पक्षाचे आणि जनतेचे मुद्दे मांडले. तुम्ही सगळे इथे या ऐतिहासिक रामलीला मैदानात जमले आहात, कारण हे मुद्दे आजही संपलेले नाहीत. देशातील तरुण, कामगार, दुर्बल घटक, अल्पसंख्याक आणि शेतकऱ्यांच्या समस्या असलेल्या अशा मुद्द्यांवर तुम्ही सर्वजण लढत आहात याचा मला आनंद आहे.'