नवी दिल्ली: नोटाबंदीला 6 वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. राहुल यांनी मंगळवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर निशाणा साधताना म्हटले की, '2-3 अब्जाधीश मित्रांच्या फायद्यासाठी नोटांदी केली गेली. आपल्या ट्विटमध्ये राहुल यांनी मोदींना 'PayPM' म्हटले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबर 2016 रोजी अर्थव्यवस्थेतील भ्रष्टाचार आणि काळ्या पैशाची समस्या दूर करण्याच्या उद्देशाने 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद केल्या होत्या. या नोटाबंदीला आज 6 वर्षे पूर्ण झाली आहेत. यावरुन राहुल यांनी मोदींवर टीका केली. मंगळवारी, त्यांनी त्यांच्या भाषणाचा एक व्हिडिओ ट्विट केला, त्यासोबत लिहिले, "नोटाबंदी ही 'PayPM' यांची जाणीवपूर्वक चाललेली चाल होती. यातून 2-3 अब्जाधीश मित्रांना फायदा मिळवून देण्याचा आहे,'' अशी टीका त्यांनी केली.
नोटाबंदीवर ‘श्वेतपत्रिका’ आणण्याची काँग्रेसची मागणी आहेनोटाबंदीला सहा वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने काँग्रेसने मंगळवारी सांगितले की, मोदी सरकारच्या या निर्णयानंतर चलनात रोख 72 टक्क्यांनी वाढली असून सरकारने त्यावर ‘श्वेतपत्रिका’ आणावी. पक्षाचे नेते गौरव वल्लभ म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीचे हे भयंकर अपयश स्वीकारले पाहिजे. 8 नोव्हेंबर 2016 हा दिवस सर्वांच्या स्मरणात असेल. भारताची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त करण्याच्या निर्णयाला आज सहावा वर्ष पूर्ण होत आहे, अशी टीका त्यांनी केली.