नोटाबंदी देशाच्या इतिहासातला 'काळा दिवस' - मनमोहन सिंग
By ऑनलाइन लोकमत | Published: December 2, 2017 08:37 PM2017-12-02T20:37:34+5:302017-12-02T22:37:51+5:30
8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे.
सूरत - गुजरात विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पोहोचलेल्या माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला. 8 नोव्हेंबर 2016 ही तारीख भारतीय अर्थव्यवस्था आणि लोकशाहीसाठी काळा दिवस असल्याचं मनमोहन सिंग यांनी म्हटलं आहे. बँकांबाहेर रांगेत उभं राहून मृत्यूमुखी पडलेल्या 100 लोकांच्या मृत्यूचं मला दु:ख असल्याचंही मनमोहन सिंग यांनी यावेळी सांगितलं. पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, '8 नोव्हेंबर हा भारतीय अर्थव्यवस्था तसंच लोकशाहीसाठी काळा दिवस होता. मी पुर्ण दु:ख आणि जबाबदारीने हे बोलत आहे. रांगेत उभ्या राहून आपला जीव गमावणा-या 100 लोकांच्या मृत्यूमुळे मी व्यथित आहे'. यावेळी मनमोहन सिंग यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधत म्हटलं की, पंडित जवाहरलाल नेहरु आणि सरदार पटेल यांच्याशी तुलना करुन मोदीजी काहीच मिळवून शकणार नाहीयेत.
I invoke memories of more than 100 people who lost their lives while standing in queues as a result of demonetisation. I say with immense pain & a sense of deep responsibility that the 8th of November was a black day for our economy & democracy: Manmohan Singh in Surat #Gujaratpic.twitter.com/AGDuZgsf5r
— ANI (@ANI) December 2, 2017
पंतप्रधान नरेंद्र मोदींप्रमाणे तुम्ही तुमच्या भुतकाळाबद्दल लोकांशी तुम्ही लोकांशी बोलता का ? असं विचारलं असता मनमोहन सिंग यांनी सांगितलं की, 'माझा भुतकाळ जाणून देशाला माझ्याप्रती सहानुभूती वाटावी अशी माझी इच्छा नाही. या मुद्द्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींसोबत कोणतीही स्पर्धा करण्याची माझी इच्छा नाही'.
I don't want the country to take a pity on the basis of my humble background. I do not think I would like to enter in any competition with Prime Minister Modi Ji on this particular matter: Former PM Manmohan Singh on why he doesn't talk about his background like PM Modi pic.twitter.com/ENK4aSWXEP
— ANI (@ANI) December 2, 2017
'जुलै सप्टेंबर तिमाहीत जीडीपीत झालेल्या 6.3 टक्के वाढीमुळे देशातील आर्थिक मंदीचं रुपडं पालटलं आहे असं म्हणणं जरा घाईचं होईल. कारण यामध्ये मध्यम आणि छोट्या क्षेत्रातील आकडेवारीचा उल्लेख नाही. ज्यांना नोटाबंदी आणि घाईघाईत लागू कऱण्यात आलेल्या जीएसटीमुळे मोठं नुकसान सहन करावं लागलं आहे', असं मनमोहन सिंग म्हणाले आहेत. त्यांनी जुलै-सप्टेंबर तिमाहीत झालेल्या 6.3 टक्के वाढीचं त्यांनी स्वागत केलं, मात्र यासोबत अर्थव्यवस्थेत सुधार झाल्याचा निष्कर्ष काढणं घाईचं होईल अशी चेतावणीही दिली.
Nothing is gained as often attempted by Modi ji to pit the two great leaders (Pandit Nehru and Sardar Patel) of power (against each other): Former PM Manmohan Singh pic.twitter.com/87HsOnTGJn
— ANI (@ANI) December 2, 2017
मनमोहन सिंग यांनी नोटाबंदी आणि जीएसटीवरुन मोदी सरकारवर टीका केली. पंतप्रधान नरेद्र मोदी लोकांना प्रभावित करण्यासाठी आणि मतं मिळवण्यासाठी अजून चांगले मार्ग शोधतील असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.