नवी दिल्ली : संघ लोकसेवा आयोगातर्फे घेण्यात येणारी नागरी सेवा कल चाचणी (सीसॅट) रद्द करण्याच्या मागणीसाठी शनिवारी एनएसयूआयच्या शेकडो कार्यकत्र्यानी केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंह यांच्या नवी दिल्लीतील निवासस्थानाबाहेर निदर्शने केली.
उत्तर दिल्लीच्या नेहरूविहार भागात बुधवारच्या सायंकाळपासून आंदोलन करीत असलेल्या यूपीएससीच्या विद्याथ्र्यावरील कथित पोलिसी अत्याचाराविरुद्ध यावेळी एनएसयूआय कार्यकत्र्यानी जोरदार घोषणाही दिल्या. एनएसयूआयचे सरचिटणीस मोहित शर्मा यांनी या आंदोलनाचे नेतृत्व केले.
सकाळी 9.3क् वाजता हे कार्यकर्ते राजनाथसिंह यांच्या घराबाहेर जमले आणि त्यांनी यूपीएससी व रालोआ सरकारविरुद्ध घोषणा दिल्या. यानंतर पोलिसांनी लगेच कठडे उभारून कार्यकत्र्याना मार्ग रोखला. यावेळी काही निदर्शकांना अटकही करण्यात आली. (लोकमत न्यूज नेटवर्क)
च्नागरी सेवा अधिका:याची निवड भाषांतर करण्याच्या क्षमतेवर नव्हे तर गुणवत्तेवर झाली पाहिजे. या ‘सीसॅट’ वादावर केंद्र सरकारने त्वरित तोडगा काढावा. अन्यथा देशभरातील विद्याथ्र्याचा रोष अधिक वाढेल. यूपीएससी परीक्षा ही परकीय भाषेचे ज्ञान तपासण्यासाठी नसून गुणवत्ता तपासण्यासाठी आहे, असे बिहारचे माजी मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी म्हटले आहे.