डेंग्यूने घेतला तरुणाचा बळी
By admin | Published: October 21, 2016 12:16 AM
जळगाव: शहरात डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खोटे नगर परिसरात संत सावता नगरातील रहिवाशी योगेश जयराम चौधरी (वय ३५) या तरुणाचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. चौधरी यांना मंगळवारी ताप व उलट्यांचा त्रास झाल्याने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने आणखी दुसर्या दवाखान्यात हलविण्यात आले. बुधवारी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असता त्यात डेंग्यू निष्पन्न झाला. पांढर्या पेशी लावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. चौधरी हे एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्या पात पत्नी,मुलगा, मुलगी, आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.
जळगाव: शहरात डेंग्यू आजाराच्या रुग्णांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत आहे. खोटे नगर परिसरात संत सावता नगरातील रहिवाशी योगेश जयराम चौधरी (वय ३५) या तरुणाचा गुरुवारी सकाळी अकरा वाजता डेंग्यू आजाराने मृत्यू झाला. चौधरी यांना मंगळवारी ताप व उलट्यांचा त्रास झाल्याने खासगी दवाखान्यात दाखल करण्यात आले होते. प्रकृती खालावल्याने आणखी दुसर्या दवाखान्यात हलविण्यात आले. बुधवारी त्यांच्या रक्ताच्या चाचण्या केल्या असता त्यात डेंग्यू निष्पन्न झाला. पांढर्या पेशी लावल्यानंतरही प्रतिसाद न मिळाल्याने गुरुवारी त्यांचा मृत्यू झाला. चौधरी हे एका खासगी कंपनीत कामाला होते. तेथे त्यांनी काही दिवसापूर्वी राजीनामा दिला होता. त्यांच्या पात पत्नी,मुलगा, मुलगी, आई, वडील, तीन भाऊ, दोन बहिणी असा परिवार आहे.फोटो...७०