शहरं
Join us  
Trending Stories
1
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
2
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
3
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
4
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
5
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
6
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
7
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
8
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
9
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
10
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
11
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
12
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा
13
अनिल अंबानींचे अच्छे दिन परतले, सलग चौथ्या दिवशी Reliance Power ला अपर सर्किट; Infra मध्येही तेजी
14
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आणि CM एकनाथ शिंदेंची भेट; 'वर्षा' बंगल्यावर अर्धा तास खलबतं
15
काँग्रेस नेत्या कुमारी शैलजा भाजपात जाणार? खट्टर यांच्या ऑफरवर दिलं स्पष्ट उत्तर...   
16
टायमिंगच्या नादात बसनं वेग पकडला; भीषण अपघातात ६ जण जागीच ठार
17
धमकी देणारा 'तो' आमदार कोण?; भरत गोगावलेंच्या गौप्यस्फोटावर संजय शिरसाट यांचा दावा
18
हमासचा नवा प्रमुख सिनवारही मारला गेला? इस्रायलने चौकशीला सुरुवात केली
19
Coldplay ची भारतात प्रचंड चर्चा! लाखो रुपयांची तिकिटं क्षणार्धात संपली; काय आहे या बँडचा इतिहास?
20
Dnyaneshwari Jayanti: माऊलींचा विश्वाला अमृत ठेवा; जगत् कल्याणाचे पसायदान देणारी ज्ञानेश्वरी

नियोजित वराने नाकारल्याने इरेला पेटलेली जेनिफर बनली सौंदर्यवती

By admin | Published: April 30, 2017 12:42 AM

लठ्ठपणा कोणालाही त्रस्त करू शकतो. अनेक लोक तर लठ्ठपणामुळे घरातून बाहेर पडणेच बंद करतात. ब्रिटनमधील लिंकनशायरमधील २४ वर्षीय जेनिफर अ‍ॅडकीन हिला

नवी दिल्ली : लठ्ठपणा कोणालाही त्रस्त करू शकतो. अनेक लोक तर लठ्ठपणामुळे घरातून बाहेर पडणेच बंद करतात. ब्रिटनमधील लिंकनशायरमधील २४ वर्षीय जेनिफर अ‍ॅडकीन हिला लठ्ठपणाची मोठी किंमत चुकवावी लागली. जेनिफरचे वजन १0८ किलो होते. तिच्या नियोजित वराने लग्नाला नऊ महिने बाकी असताना तिच्याशी ब्रेकअप केला. ही बाब जेनिफरला भयंकर लागली. तिने या घटनेला एक आव्हान म्हणून स्वीकारले आणि काही महिने कठोर परिश्रम करून ती स्लीम-ट्रीम झाली. तिने आपला लूक इतका बदलला की तिचे रूपांतर एका सौंदर्यवतीत झाले. जेनिफरचे नवे रूप पाहून तिच्या माजी नियोजित वराला आता लग्न मोडल्याबद्दल नक्कीच पश्चात्ताप होत असणार. आपले लग्न मोडल्यामुळे जेनिफर उदास झाली होती. या घटनेवरून लक्ष वळविण्यासाठी तिने आणखी जास्त जंक फूड खायला सुरुवात केली; मात्र तिला लवकरच वजन कमी करण्याची गरज असल्याचे लक्षात आले. तिने जीम जॉईन केले. जेवणातही केवळ आरोग्यवर्धक पदार्थच ठेवले. त्याचा योग्य तो परिणाम झाला. जेनिफरचे वजन आता चक्क ६0 किलो झाले आहे. जेनिफर आता पुढील महिन्यात होत असलेल्या मिस जेटिंग शेफिल्ड सौंदर्य स्पर्धेत भाग घेत आहे. तिने टॉप-१0 सौंदर्यवतींत स्थान मिळविले आहे. येथे जिंकल्यास ती मिस इंग्लंड आणि पुढे मिस वर्ल्ड स्पर्धेत जाऊ शकते. महत्त्वाचे म्हणजे आता जेनिफरला नवा प्रियकरही मिळाला आहे. त्यामुळे ती आता खुश आहे.