लखनौ : देशातील सर्वांत मोठा मदरसा (सेमिनरी) असलेल्या देवबंदच्या दारूल उलूमने स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध फतवा जारी केला आहे. स्त्री भ्रूणहत्या ही इस्लामविरोधी असल्याचे या फतव्यात म्हटले आहे.दारूल इफ्ता या अशा प्रकारचा फतवा जारी करणाऱ्या विभागाने लिंगनिदान करून गर्भपात करण्याबद्दल इस्लाम, कुराण, हादिथमध्ये नेमके काय म्हटले आहे, याचा खुलासा केला आहे. कन्या आहे म्हणून तिची आईच्या गर्भातच हत्या करणे हे बेकायदा आणि ‘हराम’ आहे. प्राचीन काळात लोक मुलीला जिवंत दफन करीत असत, ज्याचा पवित्र कुराणमध्ये धिक्कार केला आहे. भ्रूण चार महिन्यांचे झाल्यावर गर्भपात करणे बेकायदा व हराम आहे. आपल्या मुलींचा प्रेमाने सांभाळ करण्याचे व स्त्रियांचा सन्मान करण्याचे कुराण आपल्याला सांगतो, असे फतव्यात म्हटले आहे.
स्त्री भ्रूणहत्येविरुद्ध देवबंदचा फतवा
By admin | Published: June 09, 2016 5:32 AM