नवी दिल्लीः केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामण आज संसदेत बजेट सादर करत आहेत. बजेट सादर करत असताना केंद्रीय अर्थमंत्र्यांनी मोदी सरकारनं महागाई नियंत्रणात आणल्याचा दावा केला आहे. बँकेत ठेवलेल्या रकमेवरील सुरक्षा मर्यादा वाढवण्यात आल्याची घोषणा अर्थमंत्र्यांनी केली आहे.
याआधी ठेवीदाराने बँकेत ठेवलेल्या रकमेपैकी एक लाख रुपयांपर्यंतच सरकारची सुरक्षेची हमी होती. ही हमी आता एक लाख रुपयांवरून वाढवून पाच लाख रुपयांवर नेली आहे. त्यामुळे बँकेतील ठेवीदारांना मोठा दिलासा मिळणार आहे. अनेक बँका बंद झाल्यामुळे तेथील ठेवीदार अडचणीत सापडले आहे. अशा ठेवीदारांना सुरक्षा हमी रक्कम वाढविल्याने फायदा होणार आहे.
भारतीय अर्थव्यवस्था ही जगातील पाचवी सर्वात मोठी अर्थव्यवस्था आहे. सरकार मोठ्या जोशानं देशाची सेवा करत असल्याचंही निर्मला सीतारामण यांनी अधोरेखित केलं आहे. तसेच या बजेटचे उद्दीष्टच लोकांना रोजगार उपलब्ध करून देणे, उद्योगांना मजबुती देणे, सर्व अल्पसंख्यांक, अनुसूचित जाती, जमातीच्या महिलांच्या अपेक्षा पूर्ण करणे असल्याचं सीतारामण यांनी म्हटले आहे.