नवी दिल्ली : विविध मागण्यांसाठी दिल्लीचे नायब राज्यपाल अनिल बैजल यांची भेट घेऊन, पत्रे लिहूनही दुर्लक्ष केल्याच्या निषेधार्थ दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल व त्यांच्या मंत्र्यांनी गेल्या दोन दिवसांपासून नायब राज्यपालांच्या कार्यालयातच धरणे धरले आहे. तिथे आपचे मंत्री सत्येंदर जैन यांनी सुरू केलेल्या उपोषणात उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया हेही बुधवारी सामील झाले.दिल्लीतील आयएएस अधिकाऱ्यांनी चार महिन्यांपासून सुरू केलेल्या संपाचा सरकारी कामकाजावर परिणाम झाला. हा संप मागे घेण्याचा आदेश अधिकाºयांना द्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री केजरीवाल यांनी करूनही नायब राज्यपालांनी त्याकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप होत आहे. बुधवारी केजरीवाल यांच्या निवासस्थानापासून ते नायब राज्यपालांच्या निवासस्थानापर्यंत आप कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला, तर अपयशी आपचे हे नाटक असल्याचे भाजपाने म्हटले. राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी हस्तक्षेप करावा अशी मागणी आपचे राज्यसभा सदस्य संजय सिंग यांनी केली.
उपमुख्यमंत्री सिसोदिया यांचेही उपोषण सुरूच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 14, 2018 5:38 AM