धार्मिक कार्यासाठी सुट्टी नाकारली! संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; सरकारला सुनावले

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2023 02:09 PM2023-06-23T14:09:20+5:302023-06-23T14:12:32+5:30

निशा बांगरे या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

 Deputy Collector of Chhatarpur, Madhya Pradesh, Nisha Bangre resigned after not being given leave for religious work  | धार्मिक कार्यासाठी सुट्टी नाकारली! संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; सरकारला सुनावले

धार्मिक कार्यासाठी सुट्टी नाकारली! संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिला राजीनामा; सरकारला सुनावले

googlenewsNext

मध्य प्रदेशातील छतरपूर येथील एक उपजिल्हाधिकारी सध्या चर्चेत आहे. निशा बांगरे या उपजिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या राजीनाम्याची सर्वत्र चर्चा रंगली आहे. खरं तर सुट्टी न मिळाल्याने संतप्त उपजिल्हाधिकाऱ्यांनी तडकाफडकी राजीनामा दिला. निशा बांगरे यांनी आपला राजीनामा २२ जून रोजी प्रधान सचिव, सामान्य प्रशासन विभाग यांच्याकडे पाठवला आहे. त्यांना आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्कार समारंभ तसेच २५ जून रोजी त्यांच्या घराच्या गृहप्रवेशासाठी जायचे होते. पण सरकारने परवानगी नाकारली अन् त्यांनी थेट राजीनामा दिला.

दरम्यान, २५ जून रोजी मध्य प्रदेशातील बैतुल येथील आमला इथे आंतरराष्ट्रीय सर्वधर्म शांती परिषद आणि जागतिक शांतता पुरस्काराचे आयोजन करण्यात आले आहे. गगन मलिक फाऊंडेशनच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे समजते. या कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी आणि त्यांच्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी रजा मागितली होती. श्रीलंकेच्या कायदा मंत्र्यांसह ११ देशांतील सर्व धर्मांचे प्रतिनिधी शांतता पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. यामध्ये तथागत बुद्धांच्या अस्थीही श्रीलंकेतून आणण्यात येणार आहेत. पण, या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने उपजिल्हाधिकारी निशा बांगरे यांनी आपल्या पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला.

निशा बांगरे यांनी राजीनाम्याच्या पत्रात काय म्हटले?
निशा बांगरे यांनी रजा न मिळाल्याने संतप्त होत सरकारला पत्र लिहले. "वरील विषयांतर्गत मला कळवायचे आहे की, मला माझ्या घराच्या गृहप्रवेशाच्या कार्यक्रमासाठी जाण्यासाठी सुट्टी न मिळाल्याने मला दुःख झाले आहे. तसेच जागतिक शांततेचे दूत तथागत बुद्ध यांच्या अस्थिकलशाचे दर्शन मला घेऊ न दिल्यामुळे माझ्या धार्मिक भावनांना कधीही भरून न येणारी हानी पोहोचली आहे. त्यामुळे माझे मुलभूत हक्क, धार्मिक श्रद्धा आणि घटनात्मक मूल्यांशी तडजोड करून उपजिल्हाधिकारी पदावर राहणे मला योग्य वाटत नाही. म्हणूनच मी आज २२-६-२०२३ रोजी तात्काळ उपजिल्हाधिकारी पदाचा राजीनामा देत आहे", असे त्यांनी पत्रात नमूद केले आहे.
 

Web Title:  Deputy Collector of Chhatarpur, Madhya Pradesh, Nisha Bangre resigned after not being given leave for religious work 

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.